
पणजी: गोव्यात टार्गेट करुन लव्ह जिहादची काही प्रकरणे समोर आल्याचा मुद्दा गेल्या वेळेस उपस्थित करण्यात आला. पण, लव्ह जिहाद वैगेरे काही नाही असे म्हणत तो मुद्दा टाळण्यात आला, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. यावरुन विजय सरदेसाई चांगलेच आक्रमक झाले व असा काही गोव्यात प्रकार नसल्याचे सांगत ते National Narrative असल्याचे नमूद केले.
जबरदस्ती धर्मांतरणाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या छंगुर बाबा आणि आयेशा प्रकरणी उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री सावंत उत्तर देत होते.
राज्यात भाडेकरुच नव्हे तर कामगारांची देखील पडताळणी सुरु आहे. यासाठी विशेष सेल स्थापन करण्याची वीरेश बोरकरांची सूचना देखील मुख्यमंत्री सावंत यांनी मान्य केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी आयेशाला गोव्यातून अटक केल्यानंतर विरोधकांनी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.
मुख्यमंत्री सावंत यांनी याबाबत उत्तर देताना पोलिसांच्या बाजुने भाष्य करताना त्यात त्यांचा काहीही दोष नसल्याचे सांगितल, शिवाय आवश्यक त्या सर्व पद्धतीने तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायद्याबाबत आलेक्स रेजिनाल्ड यांनी मुख्यमंत्र्यांना लव्ह जिहाद अल्पसंख्याक समुदायास लागू होत नाही तसेच, धर्मांतरण कॅथलिक समाजात होत नसल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री सावंत यांनी जबदस्ती या शब्दावर जोर देत वेगवेगळे आमिष देऊन होत असलेल्या धर्मांतरणाचा उल्लेख केला. तसेच, गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडणार नाही, राज्यात वेगवेगळ्या धर्मांत लग्न झाल्याची अनेक उदाहरणे आहेत असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी समान नागरी कायद्याचा देखील उल्लेख केला.
दरम्यान, विजय सरदेसाईंनी लव्ह जिहादचा मुद्दा हा गोव्यासाठी लागूच होत नसल्याचे नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय नरेटीव्ह गोव्यात आणले, मूळ प्रश्न हा एक आरोपी गोव्यात होता आणि त्याला पोलिसांनी कशी अटक केली नाही हा होता. तो बाजुलाच गेला आणि लव्ह जिहाद, जबरदस्ती धर्मांतरण हेच मुद्दे पुढे आले. धर्मांतरण कोठून आले, कोणी केले? असलेच तर त्याची आकडेवारी द्यावी, असेही सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्री यांनी याबाबत पुन्हा एकदा पोलिसांनी आयेशा प्रकरणाच्या तपासात काहीच कसूर न केल्याचे स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.