
पणजी: विधानसभेत उत्तर प्रदेशात उघडकीस आलेले धर्मांतरणाचा मुद्दा चांगलाच गाजला, या प्रकरणातील एक संशयित आयेशाला गोव्यातून अटक करण्यात आल्याने विरोधकांनी हा विषय उचलून धरला. गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले.
दरम्यान, गृहमंत्री तथा मुख्यमंत्री सावंत यांनी याप्रकरणी अनेक राज्यात जबरदस्ती धर्मांतरण विरोधी कायदा लागू केला जात असून, गोव्यात देखील अशा कायद्याची गरज असल्याचे सांगितले.
धर्मांतरणाचा मास्टरमाईंड छंगूरबाबचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून देशात गाजत आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि विशेष टास्क फोर्सने या प्रकरणाचा पर्दाफाश केला. याप्रकरणातील आणखी एक संशयित आयेशाला गोव्यातून अटक करण्यात आली.
आयेशा हवालाद्वारे मिळणाऱ्या पैशांसाठी मुख्य लिंक होती. विरोधकांनी हा विषय लावून धरताना आयेशाची कृती देश विरोधी असल्याचे नमूद केले. गोवा पोलिस आणि सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेणे ठोस पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली.
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. गोवा पोलिसांनी याप्रकरणात सर्वोतोपरी मदत केल्याचे नमूद केले. आमच्याच सरकारमध्ये भाडेकरु पडताळणी विधेयक आणल्याचे सांवत यांनी सांगितले.
छंगुरबाबा प्रमाणे गोव्यात देखील एका असा बाबा होता पण त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. गोवा पोलिसांनी या प्रकरणात शक्य ते सर्व सहकार्य केल्याचे सावंत म्हणाले.
'उत्तर प्रदेशमध्ये जबरदस्तीने धर्मांतरण करण्यावर बंदी आहे,' असे सावंत म्हणाले. 'अनेक राज्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. गोव्यात देखील असा कायदा करण्याची गरज असून, त्याला काँग्रेसने देखील सहकार्य करणे अपेक्षित आहे,' असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
'गेल्या काही दिवसांपूर्वी लव्ह जिहाद प्रकरणाचा मुद्दा आम्ही मांडला होता. त्यावेळी लव्ह जिहाद वैगेरे काही नाही, असे म्हणू लागले. पण, या लोकांचे अशा पद्धतीने काम चालते ते वेळेवर ओळखून कारवाई करायला हवी,' असे सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.