Yuri Alemao: अधिवेशनाच्या कमी कालावधीवरून विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केला संताप; राज्य सरकार घाबरल्याची टीका

चार दिवसांचे अधिवेशन म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao: भाजप सरकारचा लोकशाहीविरोधी अजेंडा पुन्हा एकदा उघड झाला आहे. भाजप सरकारला विरोधकांचा भय वाटत असल्याचेच हे लक्षण आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. १६ ते १९ जानेवारी २०२३ या अवघ्या चार दिवसांच्या अधिवेशनाच्या गोवा विधिमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेवर तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Yuri Alemao
Goa : मध्यरात्रीपर्यंतच्या ध्वनी मर्यादेवर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

आलेमाव म्हणाले, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे धोरण भाजप सरकार नवीन वर्षातही सुरूच ठेवणार आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी पहिला दिवस असल्याने सभागृहाचे कामकाज प्रत्यक्षात ३ दिवसच होणार आहे. शुक्रवारी विधानसभा सत्रच नसल्याने परिणामी खाजगी सदस्यांच्या कामकाजाचा दिवसच नाही. त्यामुळे खाजगी सदस्यांना विधेयके आणि ठराव मांडता येणार नाहीत.

आमचे विरोधी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी गोमंतकीय वंशाच्या व्यक्तीनां खास अधिकार देण्यासाठी विधेयक मांडण्यासाठी नोटीस दिली होती, विजय सरदेसाई यांनी गोमंतकीयांनाच रोजगार देण्यासंबंधी विधेयकाची नोटीस दिली होती, तर वेंझी व्हिएगस यांनी प्राण्यांवरील क्रूरतेबाबत विधेयक तयार केले होते. गेल्या वेळी ही विधेयके कायदा विभागाकडे पाठवण्यात आली असली, तरी आगामी सत्रात विरोधकांना कोणतेही विधेयक मांडण्याची नोटीस देण्याचीही संधी मिळणार नाही, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Yuri Alemao
Goa Taxi: टॅक्सी चालकांची मुजोरी नडली; फ्रान्सच्या पर्यटकांना घेऊन येणारी 3 क्रुझ जहाजे रद्द होण्याची शक्यता...

सभापती लवकरच कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावतील अशी आशा आहे. 2023 चे पहिले सत्र किमान दोन ते तीन आठवडे असावे जेणेकरुन खाजगी सदस्यांच्या कामकाजासाठी सदस्यांना संधी मिळेल आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर सविस्तर चर्चा करणे शक्य होईल असे युरी आलेमाव यांनी सांगितले. गत अधिवेशनातील विरोधकांची कामगिरी पाहून भाजप सरकार घाबरले आहे का? असा खोचक सवालही युरी आलेमाव यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com