Goa Assembly: रेशन घोटाळा, PSI भरती, बेरोजगारीचा मुद्दा गाजणार; जानेवारीत विधानसभेचे हिवाळी अधिवेशन

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही.
Goa Government | Goa BJP
Goa Government | Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Goa Assembly Winter Session) जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे अधिवेशन होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी दिली आहे. कला अकादमी, पोगो बिल यावरून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बरेच गाजले होते. दरम्यान, हिवाळी अधिवेशन रेशन घोटाळा, PSI भरती, बेरोजगारीच्या मुद्यावरून गाजणार असे दिसत आहे.

Goa Government | Goa BJP
Goa Congress: अपात्रता याचिका! आमदार लोबो, कामतांना सभापती तवडकरांची नोटीस

जुलै 2022 मध्ये काँग्रेस आमदारांनी केलेला पक्षांतराचा प्रयत्न फसल्यानंतर विधानसभेचे पावसाळी अधिवेशन झाले होते. यावेळी कला अकादमीचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच लावून धरला. याशिवाय आरजीचे पोगो बिल देखील विना चर्चा बारगळण्यात आले. 'राज्यातील पंचायत निवडणुकीचे कारण पुढे करत सरकारकडून पावसाळी अधिवेशन लवकर गुंडाळण्यात आले, आणि राज्याच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडता आले नाहीत,' अशी टीका त्यावेळी विरोधकांनी केली होती.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. हिवाळी अधिवेशन शक्यतो एक आठवड्याचे असते असे सभापती रमेश तवडकर म्हणाले आहेत.

Goa Government | Goa BJP
Ponda: बाल लैंगिक साहित्य सोशल मिडियावर शेअर केल्याप्रकरणी फोंड्यातील एकाला अटक

काँग्रेसच्या आठ आमदारांनी 14 सप्टेंबर, 2022 रोजी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सभागृहातील भाजपचे संख्याबळ 28 झाले आहे. तर, विरोधीपक्षनेत्याची धुरा आता काँग्रेसच्या युरी आलेमाव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशानात रेशन घोटाळा, कला अकादमी नूतनीकरण, खाण लिलाव, वाढती बेरोजगारी आणि PSI घोटाळा हे मुद्दे गाजणार असे दिसत आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईं तसेच, रिव्हॉल्युशनरी गोवन्स व आम आदमी पक्षाच्या वतीने वारंवार विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com