पणजी: गोवा विद्यापीठाचा ग्रेड बी++ वर घसरल्याबद्दल राज्य सरकारवर टीका करताना नौशाद चौधरी म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या अपयशाची जबाबदारी शिक्षणमंत्री म्हणून स्वीकारली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, ग्रेड घसरल्याने गोव्यातील शिक्षणाचा दर्जा घसरल्याचे स्पष्ट होते. "गोवा सरकार विद्यार्थ्यांना इतर देशांमध्ये किंवा राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडत आहे. (CM Pramod Sawant should take responsibility for declining standards of Goa University)
एनएसयूआय गोवा युनिटचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी शनिवारी सांगितले की, गोव्यातील तरुण आता चांगल्या विद्यापीठांच्या शोधात राज्य सोडून जाण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शिक्षित राज्य असलेल्या गोव्याचा शैक्षणिक स्तर देश पातळीवर उतरत असल्याचा दावा होत असतानाच ‘नॅक’ (NAAC) संस्थेने जारी केलेल्या मानांकनात गोवा विद्यापीठाचा दर्जा घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. भोंगळ कारभार आणि राज्य सरकारची विद्यापीठाप्रती असलेली अनास्था, हे त्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते.
नॅकच्या नव्या मानांकन यादीत गोवा विद्यापीठाला 2.83 गुणांसह बी प्लस प्लस मानांकन मिळाले आहे. 2014 ते 2019 या कालावधीतील विद्यापीठाच्या कार्यावर आधारित हे मानांकन असून त्यापूर्वी गोवा विद्यापीठाला 3.60 गुणांसह ‘ए’ मानांकन प्राप्त झाले होते.
शिक्षक (Goa Teacher) भरतीसाठी झालेली हयगय आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचे गुण विश्लेषण करण्याची परिपूर्ण नसलेली यंत्रणा या दोन मुद्द्यांवर ही घसरण झाल्याचे सांगितले जाते. या नव्या मानांकन यादीने गोवा विद्यापीठाची अब्रूच वेशीवर टांगली गेली असून राज्य सरकारही शिक्षणाप्रती किती बेफिकीर आहे हे उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया याच विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका शिक्षकाने व्यक्त केली.
शिक्षकांच्या 50 टक्के जागा रिक्त
गोवा विद्यापीठाच्या (Goa University) या घसरलेल्या दर्जाबद्दल मत व्यक्त करताना एका शिक्षकाने याला विद्यापीठ, तेवढेच गोवा सरकारही जबाबदार असल्याचे सांगितले. विद्यापीठातील जुने शिक्षक निवृत्त होत असताना ज्या गतीने नव्या शिक्षकांची भरती होणे आवश्यक होते, ती मागच्या १५ वर्षांत केलीच नाही. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक जागा खाली राहिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.