समाजातील लहान घटकांना मदत करणे हे मोठे समाजकार्य: सभापती तवडकर

जो समाजासाठी काम करतो त्यांचा सत्कार करणे हे उचित काम आहे: सभापती तवडकर
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: सामान्य माणसाचे प्रश्र्न सोडविणे, समाजातील लहान घटकांना संरक्षण देणे व मदत करणे हेसुद्धा मोठे समाजकार्य आहे. जो समाजासाठी काम करतो त्यांचा सत्कार करणे हे उचित काम आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. (Helping small sections of society is big social work says Ramesh Tawadkar)

Ramesh Tawadkar
मुसळधार पावसामुळे वाळपईतील लोकांचे नुकसान

दलित सेवा संघटनेच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, माजी नगराध्यक्ष अविनाश शिरोडकर, सोपान बुदबडकर, किसन फडते आदी उपस्थित होते. माणसाने सदैव सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारामुळे समाजाचे प्रश्र्न वाढतात. सभापतिपदाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहतो. सभापतीची प्रतिष्ठा जपण्याचा व या पदाला न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील.

Ramesh Tawadkar
गोव्यातील पंचायत निवडणुकांची तारीख अद्याप निश्‍चित नाही: गुदिन्हो

दुर्बल घटकांसाठी आपण कार्यकर्त्यांच्या साहाय्याने महिन्याला एक घर (House) बांधून देणार असा संकल्प असल्याचे तवडकर यांनी सांगितले. मी निवडून आलो नाही, तरी समाजासाठीचे माझे कार्य सतत चालू राहील. जे समाजासाठी काम करतात त्यांना आपला सदैव पाठिंबा राहील, असे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavlekar) म्हणाले. संघटनेच्या अध्यक्षा विनिशा तांबोसकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सचिव उत्तम रेडकर यांनी आभार मानले, तर अनुया शिरोडकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com