Jit Arolkar Birthday : मांद्रे मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

आमदार जीत आरोलकर यांच्या वाढदिनी पाणी प्रकल्प फलकाचे अनावरण
MLA Jit Arolkar Birthday celebration
MLA Jit Arolkar Birthday celebration Dainik Gomantak
Published on
Updated on

मांद्रे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार जीत आरोलकर प्रयत्नशील असून त्यांनी आजपर्यंत सरकारच्या निधीतून आणि आपल्या वैयक्तिक पातळीवरून विकास केल्याने ते लोकप्रिय ठरले आहेत.

याही पुढे सरकारच्या माध्यमातून मांद्रेच्या सर्वतोपरी विकासासाठी मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रे मतदारसंघासाठी खास 30 एमएलडी पाणी प्रकल्पाच्या भूमिपूजन फलकाचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमात दिली.

मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाराणसी - काशी येथील विश्वेश्वर देवस्थानच्या पुरोहितांमार्फत मांद्रे मतदारसंघासाठी आणि सर्व गोमंतकीयांना सुख, समृद्धी, आरोग्य, चांगले जीवन मिळावे यासाठी महायज्ञाचे आयोजन केले होते.

MLA Jit Arolkar Birthday celebration
Bicholim News : ग्रामीण भागात घरांची शाकारणी सुरू; प्लास्टिकलाही मागणी

आमदार जीत आरोलकर, सौ. सिद्धी जीत आरोलकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर खास गंगा आरतीचे आयोजन करण्यापूर्वी मांद्रे मतदारसंघाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, नावेलीचे आमदार उल्हास नाईक तुयेकर, माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, साळगावचे आमदार केदार नाईक, मयेचे आमदार प्रमेंद्र शेट, कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, तुयेच्या सरपंच सुलक्षा नाईक, मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत, विर्नोडाच्या सरपंच सुजाता ठाकूर, केरीच्या सरपंच सुलक्षा तळकर, पाणी विभागाचे अभियंते सोमा नाईक, संदीप मोरजकर उपस्थित होते.

MLA Jit Arolkar Birthday celebration
Ponda Municipal Elections 2023 : प्रभाग 4, 6, 8, 14मध्ये तीव्र लढा; गाठीभेटी वाढल्या

‘मांद्रेत कला भवन व क्रीडा मैदान’

कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी मांद्रे मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार जीत आरोलकर धडपडत आहेत. तसेच नियोजनबद्ध विकासासाठी ते सरकार पातळीवर प्रयत्न करत आहेत.

या तालुक्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण लवकरच मांद्रे मतदारसंघात रवींद्र भवनची उभारणी करणार आहे. शिवाय मांद्रे पंचायत क्षेत्रात भव्य क्रीडांगण उभारले जाईल, अशी ग्वाही दिली.

मुख्यमंत्र्यांकडून आरोलकरांचे अभिनंदन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, की आमदार जीत आरोलकर यांनी जनकल्याणासाठी महायज्ञाचे आयोजन करत गंगा आरतीच्या दर्शनाचा एक चांगला उपक्रम राबविला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

कोणाचाही वाढदिवस असेल, तर चिकन, मटन, मासे अशा पार्ट्यांचे आयोजन होते, परंतु आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या वाढदिनी पार्टी आयोजित न करता देवदेवतांचे दर्शन आणि जनकल्याणासाठी गंगा आरतीचे आयोजन करून महाप्रसाद ठेवून एक चांगला पायंडा पाडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विकासासाठी सरकारचे योगदान

आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले, की मांद्रे मतदारसंघासासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सरकारचे शंभर टक्के योगदान मिळाले आहे. मुख्यमंत्री आपल्याला छोट्या बंधूसारखी वागणूक देऊन विकासकामांसाठी प्रोत्साहन देतात.

मांद्रे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी लवकरच ३० एमएलडी पाणी प्रकल्प उभारला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com