रोजगार विनिमय केंद्रामध्‍ये 1 लाख 20 हजार युवकांची नोंदणी : मुख्यमंत्री डॉ. सावंत

कौशल्य अपग्रेड करण्यासाठी आमचे प्रयत्न : मुख्यमंत्री
Goa Assembly Monsoon Session 2023 CM Sawant
Goa Assembly Monsoon Session 2023 CM Sawant Dainik Gomantak

Goa Assembly Monsoon Session 2023 : खासगी कंपन्यांकडील रोजगाराविषयी रोजगार आणि मजूर खात्याकडे कोणतीही माहिती नाही. रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी झालेल्या युवकांना सरकारी नोकरी लागली तरी ते आपले कार्ड रद्द करीत नसल्‍याचे दिसून आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सध्याच्या घडीला 1 लाख 20 हजार युवकांची रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी झालेली आहे, असेही ते म्‍हणाले. आमदार विजय सरदेसाई यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते.

Goa Assembly Monsoon Session 2023 CM Sawant
AAP MLA Venzy Viegas : सरकारची हुकूमशाही आम्ही खपवून घेणार नाही : व्हिएगस

मुख्यमंत्री म्हणाले, रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी झालेल्‍यांपैकी १ लाख १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतील. हे युवक रोजगार विनियम केंद्रात बेरोजगार म्हणूनच नोंदीत असतात. मजूर किंवा श्रमाची कामे गोव्यातील मुले करीत नाहीत.

आम्‍ही याबाबत कौशल्य विभाग आणि मजूर रोजगार विभागाच्या वतीने संयुक्तपणे पुढील अधिवेशनात कायदा आणू. कौशल्य अपग्रेड करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मच्छीमार ट्रॉलर्सवर यापूर्वी गोंमतकीय युवक काम करायचे, पण आता १०० टक्के मजूर हे परप्रांतीय असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

Goa Assembly Monsoon Session 2023 CM Sawant
Sadanand Tanavade : तानावडेंची मराठीतून शपथ; राज्यसभेत रुजू

विजय सरदेसाई म्हणाले, बेरोजगारीविषयी राज्य सरकारकडे कोणताही डेटा नाही. नीती आयोगाचा अहवालही सरकारने फेटाळला आहे. बँकांमध्ये नोकऱ्या करणारे कोकणी बोलत नाहीत.

खासगी क्षेत्रात गोमंतकीयांना ८० टक्के नोकऱ्या देण्याविषयी आपण केवळ ऐकत आलो आहोत. त्याची अंमलबजावणी कधी होणार? १ लाख ९५९ युवकांना नोकऱ्या लागल्या आहेत. त्यात ५० हजार ८६१ गोमंतकीय तर ५० हजार ९८ बिगरगोमंतकीय आहेत.

यावरून स्पष्ट होते की राज्यातील खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे ५० टक्के लोक बिगरगोमंतकीय आहेत. ३१९ कंपन्यांनीच डेटा दिला. या कंपन्यांमध्‍ये किती लोक गोव्यातील आहेत? असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com