Gandhi Jayanti 2023: धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय ही गांधीजींची संकल्पना सरकार पुढे नेणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत
Goa CM Pramod Sawant Tributes To Mahatma Gandhi At Old Goa
Goa CM Pramod Sawant Tributes To Mahatma Gandhi At Old GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa CM Pramod Sawant Tributes To Mahatma Gandhi: गोव्यात मागील काही दिवसांत धार्मिक भावना दुखावण्याच्या अनेक घटना घडत आहेत. धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

जातीय सलोखा बिघडवण्याचा गोष्टी कदापि सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

ओल्ड गोवा येथे महात्मा गांधी जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर भाष्य केले.

यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहिली

Goa CM Pramod Sawant Tributes To Mahatma Gandhi At Old Goa
Burning Car Goa News: पर्वरी, थिवी येथे बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महात्मा गांधींनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली आहे. राज्यात मागील काही दिवसांत दुसऱ्या धर्माचा द्वेष करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन धार्मिक भावना दुखावण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

असे प्रकार सरकार सहन करणार नाही. अशा संबंधित समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सर्व धर्माचे लोक गोव्यात गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे कोणीच दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करू नये. सर्वांनी आपल्या धर्माचे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय ही गांधीजींची संकल्पना पुढे नेण्यासाठी गोवा सरकार प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod swant
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Goa CM assures solution to Mapusa traders problems
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com