CM Pramod Sawant: शिवाजी महाराज हे सनातन धर्माचे खरे कैवारी; मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य...

बजरंग दलाच्या शौर्य यात्रेचे साखळीत आगमन; भरपावसात मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: छत्रपती शिवाजी महाराज हे सनातन धर्माचे खरे कैवारी आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. बजरंग दलाच्या वतीने काढण्यात आलेली शौर्य दिन यात्रा आज, गुरूवारी साखळीत पोहचली.

येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौकात या यात्रेचे संध्याकाळी आगमन झाले. यावेळी भरपावसात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या यात्रेचे स्वागत केले. यावेळी साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि शिवप्रेमी उपस्थित होते. संपूर्ण राज्यभरात ही यात्रा जाणार आहे.

CM Pramod Sawant
Goa Students Eye Surgery: गोव्यातील 300 शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर होणार शस्त्रक्रिया

सावंत म्हणाले, यात्रेत सहभागी सर्वांचे अभिनंदन आणि स्वागत. या यात्रेच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळत आहे. सतानन धर्माचे खरे कैवारी जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत.

नवयुवकांना प्रेरणा देण्यासाठी काढलेली ही यात्रा आहे. या यात्रेस खूप शुभेच्छा. संपूर्ण राज्यभर शिवमय वातावरण झाले आहे. त्याबदद्ल विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे अभिनंदन.

मुख्यमंत्री सावंत आणि त्यांची पत्नी भाजपच्या पदाधिकारी सुलक्षणा सावंत यांनी शिवपुतळ्याला पुष्पहार घातला तसेच पुतळ्याचे पूजन केले. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी आरतीचे ताट घेऊन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिवाजी महाराजांचा जयघोष, भगवे ध्वज घेऊन नाचणारे युवक असे शिवमय वातावरण यावेळी येथे होते.

CM Pramod Sawant
Goa Agriculture Policy: शॅक धोरणानंतर आता कृषी धोरण; जानेवारीपर्यंत तयार होणार राज्याची अ‍ॅग्रीकल्चर पॉलिसी

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे हे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 1 ऑक्टोबर रोजी दक्षिण गोव्यातील बेतुल किल्ल्यावरून या यात्रेला सुरवात करण्यात आली होती.

विहिंपच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर विहिंप आणि बजरंग दलाने 'छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जन जागरण यात्रा' काढण्याची घोषणा केली होती. हिंदू समाजाच्या शौर्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही यात्रा आहे.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. त्यामुळे त्यांचे नाव या यात्रेला देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com