CM Pramod Sawant: आगामी दोन वर्षात पणजी शहर स्मार्ट सिटीसह सोलर सिटी बनवणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. सौर उर्जेबाबत जागृतीसाठी तयार केलेल्या रथाच्या उद्घाटनप्रसंगी, शुक्रवारी ते बोलत होते. हा रथ राजधानी पणजीत सौर उर्जेसाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागृती करणार आहे.
दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पणजी शहराची वीजेची गरज आहे 80 मेगावॉट. इतकी वीज सौरउर्जेद्वारे बनवली जाणार आहे. त्यासाठी लोकसहभागही महत्वाचा आहे. सरकारी इमरतींसह लोकांनी घरावर सोलर पॅनेल बसवावेत. त्यातून पणजीला लागणारी सर्वच्या सर्व 80 मेगावॉट वीज सौरउर्जेद्वारे बनवली जाईल.
सरकारी इमारती आणि लोकांनी त्यांच्या घरांवर सोलर पॅनेल बसवले तर त्याचा फायदा होईल. त्याला पर्याय म्हणून आम्ही खासगी उद्योगांनाही सुचवले आहे. उदाहरणार्थ कॅसिनोसारख्या उद्योगांनीही बाहेर सोलर पॅनेल बसवावेत. त्यातून तयार झालेली वीज ट्रान्सफर केली जाईल.
त्यातून 80 मेगावॉट वीज सौरउर्जेपासून बनविणे शक्य होईल. 'गेडा'चा अध्यक्ष म्हणून गेडातर्फे सौरउर्जेबाबत जागृती करणाऱ्या एका रथाची सुरवात केली आहे. हा रथ शहरात सोलर उर्जेसाठी जागृती करेल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.