Rohan Khaunte: गोव्यात बेकायदा टुरिझम गाईड्सना विरोधच

पर्यटन मंत्री रोहन खंवटे; GEL मुळे वॉटर स्पोर्ट्सला तंत्रज्ञानाचा लाभ होईल
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

Rohan Khaunte: गोव्यात बेकायदा पर्यटन गाईड्सना माझा विरोधच आहे. मी वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्सच्या बाजुनेच आहे. तसेच GEL मुळे वॉटर स्पोर्ट्सला तंत्रज्ञानाचा लाभ होईल, असे मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

Rohan Khaunte
Mauvin Godinho: जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच प्रशासन तुमच्या दारी उपक्रम

रोहन खंवटे म्हणाले की, जीईएल कशाचाही ताबा घेणार नाही. काही आमदार याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्सना उगाचच भीती दाखवत आहेत. पर्यटन व्यवसायात अनेक दलाल आहेत.

आणि त्यांनी गोव्याचे नाव बदनाम केले आहे. अशांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. आपल्याकडे पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. याबाबत सरकार लवकरच कार्यवाही करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com