Goa Dairy: पशुखाद्य प्रकल्पात स्फोट, दोषींवर कारवाई करण्याचा इशारा

मोलेसिसच्या वाहिनीत स्फोट झाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Goa Dairy Blast
Goa Dairy BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda: म्हारवासडा - उसगाव येथील गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पात काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास मोलेसिसच्या वाहिनीत स्फोट झाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई तसेच इतर संचालकांनी पाहणी केली असून वर्षभरापूर्वी केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळेच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गोवा डेअरीतर्फे देण्यात आला आहे.

गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पात मोलेसिस तयार करण्याच्या टाकीला जोडलेल्या वाहिनीत संध्याकाळी अचानक स्फोट झाला. त्यामुळे सुमारे तीस हजार मेट्रिक टन मोलेसिस (Metric Ton Molasses) वाहून वाया गेले. या सर्व प्रकारामुळे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी केला आहे. दुर्गेश शिरोडकर यांच्या कारकिर्दीत या टाक्यांचे काम करण्यात आले होते. या कामाला वर्षही पूर्ण झाले नसताना हा स्फोट झाला आहे.

Goa Dairy Blast
Curlie's Night Club: वादग्रस्त कर्लिस नाईट क्लब होणार जमीनदोस्त

मोलेसिसची टाकी (Molasses Tank) व वाहिनीचे काम करण्यासाठी सुरवातीला आठ लाख रुपये खर्चून तीन टाक्यांची दुरुस्ती करण्याची निविदा काढण्यात आली. मात्र, त्यानंतर लगेच हा निर्णय फिरवून दोन टाक्यांच्या दुरुस्तीसाठी चौदा लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली व हे काम करण्यात आले. मात्र, या कामात वापरण्यात आलेले साहित्य सुमार दर्जाचे असून त्यावर कोणत्याच कंपनीचे नाव नाही. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे टाकी व वालसहित वाहिनीचे नुकसान झाले आहे, असे राजेश फळदेसाई यांनी सांगितले.

Goa Dairy Blast
एकाच कारचालकाची 2 दुचाकी अन् एका ट्रकला धडक, चालकासह पादचारी गंभीर जखमी

कामगारांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

स्फोट झाला तेव्हा जर कामगार जवळ असते, तर मोठा अनर्थ घडला असता, असे संचालक विठोबा देसाई यांनी नमूद केले. विशेष म्हणजे दुरुस्तीसाठी काढून ठेवण्यात आलेल्या जुन्या वाहिन्या चांगल्या स्थितीत आहेत. मात्र, त्या दुरुस्तीसाठी बदलण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com