Goa Tourist Accident: गोव्यात वाढदिवसासाठी आलेले कुटूंब; कारची चुकली वाट अन् अपघातात आईचा झाला मृत्यू...

कासावलीत अपघात; बंगळूरूच्या कुटुंबावर काळाचा घाला
Accident
Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourist Accident: गोवा हे देशभरातील पर्यटकांसाठी सेलिब्रेशनचे ठिकाण आहे. त्यामुळे गोव्यात सेलिब्रेशनसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते.

असेच एक कुटूंब आपल्या मुलाचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्यात आले, पण दुर्दैवाने त्यांच्यावर सेलिब्रेशनऐवजी दुःख करण्याची वेळ आली.

त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात कुटूंबातील सदस्य गमवावा लागल्याने ऐन वाढदिवसादिवशीच त्या कुटूंबावर मोठा आघात झाला आहे.

Accident
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत इंधन दरात वाढ, दक्षिण गोव्यातील दर घटले; जाणून घ्या आजचे दर...

बंगळूरू येथील करन शर्मा हा आपल्या आईवडिलांसोबत कारमधून गोव्यात येत होता. त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे कुटूंबीय गोव्यात येत होते.

कर्नाटकातून कारने ते गोव्यात आले. पण या कारला बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कांसावली येथे अपघात झाला.

एक भरधाव ट्रक वेर्णाच्या दिशेने जात असताना ट्रक आणि कारची धडक झाली. ट्रकचालक राकेश कुमार (वय 19, रा. मूळ झारखंड) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दुसऱ्या लेनवर गेला.

त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या शर्मा कुटुंबीयांच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला.

Accident
Goa Liquor Revenue: एक, दोन नव्हे महसुलात तब्बल 6 पट वाढ; मद्यविक्रीतून गोवा मालामाल...

या अपघातात करन याच्यासह त्याचे वडील विनीत शर्मा (वय 53), आई प्रियंवदा (53) गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच करन याची आई प्रियंवदा यांचा मृत्यू झाला.

तर विनीत शर्मा व करण शर्मा यांना उपचाराअंती गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

शर्मा कुटूंबीय कोलवा येथे जाणार होते. ते चूकून वेर्णाच्या दिशेने पोहोचले. कोलव्याकडे जाण्यासाठी त्यांनी कासावलीहून प्रयाण केले आणि तिथेच हा अपघात झाला. अपघातानतर ट्रकचालक पळून गेला होता, मात्र वेर्णा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com