Swayampurna Goa: 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज; आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी तालुका नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांसोबत बैठक मंत्रालयात घेतली.
CM Pramod Sawant About Swayampurna Goa
CM Pramod SawantX
Published on
Updated on

CM Pramod Sawant About Swayampurna Goa

पणजी: ग्राम पंचायत पातळीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासनातर्फे विशेष शिबिरे याआधीच सुरू करण्यात आली आहेत. तसेच इतर विभागांकडून राज्यव्यापी कार्यशाळांचे नियोजन सुरू आहे. लवकरच विविध विभागांकडून गाव पातळीवर अशाच प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, आणि त्याचे तपशील लवकरच जाहीर केले जातील.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी तालुका नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांसोबत बैठक आज मंत्रालयात घेतली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. बैठकीत स्वयंपूर्ण पोर्टलच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्याचा अधिक प्रभावी वापर कसा करता येईल यावर चर्चा झाली.

CM Pramod Sawant About Swayampurna Goa
Goa BJP: 'आगामी निवडणुकांसाठी सर्व मंडळांनी सज्ज राहावे'; सदस्य नोंदणी अपयशावरून तानावडेंनी केले सूचक विधान

स्वयंपूर्ण गोवा मोहीम या उपक्रमामुळे ३.२ लाखांहून अधिक नागरिकांना सकारात्मक फायदा झाला आहे. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेमध्ये उद्योजकता व कौशल्य विकासाला विशेष प्राधान्य दिले जात आहे, ज्यामुळे नागरिकांना आत्मनिर्भर होण्यास प्रोत्साहन मिळेल. नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना व मुख्य सचिव व्ही. कांदावेलू बैठकीस उपस्थित होते.

CM Pramod Sawant About Swayampurna Goa
Goa Politics: 'ही टीका नसून आश्वासनांची आठवण', मुख्यमंत्र्याच्या तंबीनंतर काब्रालांनी दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोवा मोहिमेत प्रत्येक गोमंतकीय सहभागी होण्यासाठी पावले टाकण्याची सूचना या बैठकीत केली. राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक खातेनिहाय प्रशिक्षणाची सोयही गाव पातळीवर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com