
पणजी: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पणजी पोलिसात गुन्हा नोंद असलेल्या रामा काणकोणकर याला न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेताना उत्तर गोव्याच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने काणकोणकर याला अटक केली, तर त्याची ५० हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर सुटका करावी, असा आदेश दिला आहे.
ध्वनीचित्रफीत समाज माध्यमांवर जारी करून काणकोणकर याने कुंडई येथील सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप ठेवत काणकोणकर याच्या विरोधात एफआयआर दाखल करावा यासाठी पणजी पोलिस ठाण्याबाहेर स्वामींचे भक्तगण याच आठवड्यात जमले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली. मात्र, मोबाईल घरी ठेवून बेपत्ता झालेल्या काणकोणकर याला पकडणे पोलिसांना शक्य झालेले नाही,या प्रकरणाची अधिक माहिती १७ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.
काह दिवसांपूर्वी ब्रह्मेशानंदआचार्य यांनी पर्वरीतील खापरेश्वर मंदिरवादावर एक मोठं वक्तव्य केलं होतं. खापरेश्वर मंदिराच्या जागेबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी या जागेची सीमा देखील वाढवली जाऊ शकते असं विधान केल्याचं रामा कणकोणकर याने सांगितलं.
या विधानावर आक्रमक भूमिका घेत रामा कणकोणकर याने थेट ब्रह्मेशानंदआचार्य यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. राखणदाराबद्दल किंवा राखणदाराच्या जागेबद्दल बोलणारे तुम्ही कोण? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. ब्रह्मेशानंदआचार्य हे धर्माचे गुरु कमी आणि राजकारणी अधिक असल्याचं देखील तो म्हणाला. ब्रह्मेशानंदआचार्य स्वामींना त्यांनी खोटं आणि फसवं म्हटलंय आणि अशी लोकं धर्मगुरू असूच शकत नाही असं विधान केलंय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.