जखमी युवतीसाठी मुख्यमंत्र्यांनी रोखला ताफा, आमोणा पुलाजवळ अपघात: ताफ्यातील वाहनातून उपचारासाठी बेतकी आरोग्य केंद्रात रवाना

Goa CM Pramod Sawant accident help: मांडवी नदीवरील आमोणा-खांडोळा येथील पुलाजवळ दुचाकीस्वार युवतीचा अपघात झाल्याचे दिसताच पणजीच्या दिशेने जाणारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ताफा तात्काळ थांबला
Goa CM Pramod Sawant accident help
CM Pramod Sawant accident help
Published on
Updated on

खांडोळा: मांडवी नदीवरील आमोणा-खांडोळा येथील पुलाजवळ दुचाकीस्वार युवतीचा अपघात झाल्याचे दिसताच पणजीच्या दिशेने जाणारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ताफा तात्काळ थांबला. रस्त्यावर अपघातग्रस्त अवस्थेत पडलेल्या युवतीला पाहून डॉ. सावंत यांनी कोणताही विलंब न करता वाहनातून खाली उतरून तिच्याजवळ धाव घेतली. मुख्यमंत्रीपदाची व्यस्तता आणि पुढील कार्यक्रम बाजूला ठेवत त्यांनी सर्वप्रथम जखमी युवतीच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तिची तपासणी केली. अपघातामुळे युवतीच्या पायांना दुखापत झाल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. जखमीला उपचारासाठी बेतकी आरोग्य केंद्रात पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार ताफ्यातील एका वाहनातून सदर युवतीला तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे तिच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले.

Goa CM Pramod Sawant accident help
Goa Cricket Association: अनधिकृत क्रिकेट स्पर्धांत खेळणे महागात पडणार; 'जीसीए'चा नोंदणीकृत खेळाडूंना कडक इशारा

मुख्यमंत्र्यांचा ताफा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी पुढे जात असताना रस्त्यातील अपघातग्रस्त व्यक्तीसाठी थांबणे, हा प्रसंग उपस्थित नागरिकांसाठीही विशेष ठरला. काही क्षणांसाठी ताफ्याची वाहने थांबली आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः जखमी युवतीची विचारपूस केल्याचे पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले. या प्रसंगातून पदापेक्षा माणुसकीला महत्त्व देण्याची भावना अधोरेखित झाली.

Goa CM Pramod Sawant accident help
Goa Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; 'त्या' तिघांच्या जामिनावर 18 रोजी निकाल, आव्हान याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण

...भावस्पर्शी अनुभव

सत्तेच्या सर्वोच्च जबाबदारीवर असतानाही संकटात सापडलेल्या एका सामान्य नागरिकाच्या मदतीसाठी तातडीने पुढे येण्याची डॉ. सावंत यांची भूमिका उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. अपघातग्रस्ताला मदतीचा हात देत त्यांनी केवळ प्रशासनिक संवेदनशीलताच नव्हे, तर माणुसकीची जाणीवही दाखवून दिली. ‘ताफा पुढे नेण्यापेक्षा एका जखमी युवतीला मदत मिळणे महत्त्वाचे मानत ताफा थांबविण्याचा हा प्रसंग उपस्थितांसाठी माणुसकीचा भावस्पर्शी अनुभव ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com