CM Pramod Sawant : कला अकादमी स्‍लॅब प्रकरणात मुख्‍यमंत्र्यांकडून मंत्री गावडेंना क्‍लीन चिट

शांतताप्रिय गोव्‍यात धार्मिक सलोखा गरजेचा : सावंत
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant Gives Clean Chit To Minister Govind Gaude: देशाच्या स्वातंत्र्याला 76 वर्षे तर गोवा मुक्तीला 62 वर्षे पूर्ण झाली तरीही राज्यात अजूनही गुलामगिरीची मानसिकता दिसून येते. ती नष्ट झाली पाहिजे.

नवभारताबरोबरच नवा गोवा निर्माण झाला पाहिजे. कला अकादमीच्‍या खुल्‍या रंगमंचाचा स्‍लॅब कोसळला त्‍यास कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे जबाबदार नाहीत.

येत्‍या ऑक्‍टोबरपासून कला अकादमी सुरू करण्‍यात येईल, असे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.

राज्याची प्रतिमा सर्वधर्म समभाव आणि शांतताप्रिय अशी आहे. मात्र ही शांतता भंग करण्याचे षडयंत्र रचले जात असण्याची शक्यता आहे.

CM Pramod Sawant
Goa Janta Darbar : कुडचडे येथे सरकारी बाबूंच्‍या गलथान कारभाराचा ‘पंचनामा’

विजय, कार्लुस, वीरेशची कामगिरी चांगली

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडत १८ दिवसांत १८ घोटाळे बाहेर काढल्याचा दावा केला होता.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारचे काम पारदर्शक असून विरोधक बिनबुडाचे आरोप करतात. अधिवेशनात विरोधकांमध्ये विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा आणि वीरेश बोरकर यांची कामगिरी चांगली जाणवली. तर, सरकारतर्फे मंत्री

नीलेश काब्राल, सुदिन ढवळीकर, रोहन खंवटे, दाजी साळकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स, संकल्प आमोणकर यांची कामगिरी चांगली झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com