
फातोर्डा: देशाचा सर्वव्यापी विकास भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. गोव्यात दहा वर्षे आणि केंद्रात सात वर्षे भाजपाचे सरकार सत्तेवर असल्यामुळे देशाचा आणि गोव्याचाही सर्वांगीण विकास झाला. हा बहुमोल सर्वव्यापी सर्वांगीण विकास पुढेही सुरू राहावा, यासाठी गोव्यात पुन्हा एकदा भाजपला साथ देऊन फातोर्डा मतदारसंघातून (Fatorda Constituency) दामू उर्फ दामोदर नाईक यांना निवडून द्या, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज (मंगळवारी) केले. (Statement of j P Nadda On backdrop of Assembly elections)
फातोर्डा मतदारसंघातील मुरिदा येथे जे. पी. नड्डा यांची जाहीर सभा झाली. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, खासदार विनय तेंडुलकर, भाजपाचे फातोर्डाचे उमेदवार दामू नाईक, कारवारच्या आमदार रुपाली नाईक, ठाणेचे आमदार संजय केळकर, फातोर्डा भाजप मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
नड्डा म्हणाले, भाजपने गोव्याचा भरीव विकास केलेला आहे. भाजपने कधी जाती-धर्माचे राजकारण केले नाही. सर्व धर्माच्या लोकांसाठी सर्वांचा विकास व्हावा या हेतूने ‘सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास’ या ध्येयाने केंद्रात आणि राज्यातही काम केलेले आहे. भाजपाच्या काळात कुठेही जातीय दंगली झालेल्या नाहीत बॉम्ब स्फोट झालेले नाहीत आणि हे भाजप सरकारचे यश आहे.
आपण भारतीय जनता पक्षाचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडली. दोन वेळा आमदार झालो. स्व. मनोहर पर्रीकर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले आणि फातोर्डाचा शक्य तेवढा विकास केला. त्यानंतर गेल्या दोन निवडणुकीत पराभूत झालो तरी लोकांशी संपर्क तोडलेला नाही. 14 फेब्रुवारीला फातोर्डावासीयांनी निर्णायक विचार करण्याची गरज आहे. गोव्याच्या विकासासाठी आपणास काय हवे त्याचे चिंतन करा आणि भाजपा गोव्याचा विकास करू शकतो हे स्पष्ट झालेले असल्यामुळे फातोर्डातून मला विजयी करा, असे आवाहन दामोदर नाईक यांनी केले.
विद्यमान आमदारामुळे फातोर्ड्याचा विकास खुंटला आहे. आजही सोनसोडोचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे याचा त्रास फातोर्ड्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. फातोर्ड्याचा समस्या सुटण्यासाठी भाजपला (Goa BJP) या मतदारसंघात प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असल्याने जनतेला येत्या निवडणुकीत पाठिशी राहून भाजपला विजयी करावे. जनतेच्या समस्या व प्रकल्पांना प्रथम प्राधान्य देऊन आपण कार्यरत राहीन, अशी ग्वाही दामोदर नाईक यांनीदिली.
आरोग्य सुविधांसाठी पुढाकार
गोव्यात (Goa) पायाभूत सुविधांचे जाळे उभारताना आरोग्य सुविधांमध्ये अनेक नवीन इस्पितळे बांधण्यात आलेली आहेत. गोवा वर्ल्ड क्लास सोसिओ इकॉनोमिक केंद्र व्हावे यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. चार हजार कोटी रुपये आत्मनिर्भर भारतअंतर्गत केंद्र सरकारने गोव्याला दिलेले आहेत. केंद्र आणि राज्य मिळून गोव्याचा डबल इंजिनचे सरकार विकसित गोवा विकसित राज्य करत आहे. देशातील प्रमुख व आकर्षक राज्यांपैकी गोवा हे एक असल्याने या ठिकाणचा विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी मदत करण्यात आली आहे. त्यामुळेच आज गोव्यात लोकोपयोगी प्रकल्प उभे राहिल्याचे नड्डा म्हणाले.
तृणमूलकडून दिशाभूल
पश्चिम बंगालधील तृणमूल काँग्रेस गोव्यात लोकांना मोफत देण्याचे आश्वासन देऊन दिशाभूल करत आहे. दिल्लीत वीजपुरवठा सुरळीत न करू शकणारे आम आदमी पक्षाचे नेते गोव्यात मोफत वीज देण्याचे आश्वासन देत आहेत. अशा आश्वासनांना गोवेकरांनी भुलू नये, असेही नड्डा म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.