Goa Politics: दिल्ली भेटीबाबत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचे मौन

Pramod Sawant Delhi Meeting: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
 Pramod Sawant Delhi Meeting
Pramod Sawant Delhi MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन नबीन यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत दोन्ही नेत्यांनी मौन बाळगले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना, वैयक्तिक कामानिमित्त मी गोव्याबाहेर गेलो होतो. नितीन नबीन यांना आपण फोनवरूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असे सांगितले.तर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही, मीसुद्धा वैयक्तिक कारणास्तव दिल्लीला गेलो होतो. रविवारी तेथून परतलो, असे स्पष्टीकरण दिले.

 Pramod Sawant Delhi Meeting
V.D. Satheesan New CM: काँग्रेसचे व्ही. डी. सतीशन बनले केरलमचे नवे मुख्यमंत्री, 60 वर्षांनंतर रचला नवा इतिहास; संपूर्ण कॅबिनेटने घेतली एकत्र शपथ VIDEO

मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सावंत, दामू नाईक, नितीन नबीन आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती, पक्षसंघटनेची मजबुती आणि मंत्रिमंडळातील रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, या भेटीबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

वलयांकित मुद्दे

  •  आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी

  •  भाजप संघटना अधिक मजबूत करण्यावर भर

  •  मंत्रिमंडळातील रिक्त जागांबाबत चर्चा

  •  दिल्ली भेटीबाबत अधिकृत मौन कायम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant On Konkan
Goa Government Development Exhibition
Goa Temple Tourism
Pramod Sawant Delhi Visit
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com