Goa Politics: गोवा देशासाठी विकासाचे मॉडेल! मुख्‍यमंत्र्यांचे राहुल गांधींना खणखणीत प्रत्‍युत्तर, म्हणाले, 'ही यात्रा नव्हे तर जत्रा'

cm pramod sawant criticizes rahul gandhi: गोवा हे देशभरासाठी विकासाचे मॉडेल बनले आहे. त्‍यामुळे राहुल गांधींसारख्‍या नेत्‍यांनी गोव्‍यासंदर्भात बोलण्‍याआधी विचार करावा, असे म्‍हणत, ‘‘विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुरू केलेली गोवा राखण यात्रा ‘जत्रा’ झाली आहे.
cm pramod sawant criticizes rahul gandhi
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा हे देशभरासाठी विकासाचे मॉडेल बनले आहे. त्‍यामुळे राहुल गांधींसारख्‍या नेत्‍यांनी गोव्‍यासंदर्भात बोलण्‍याआधी विचार करावा, असे म्‍हणत, ‘‘विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुरू केलेली गोवा राखण यात्रा ‘जत्रा’ झाली आहे.

ही ‘जत्रा’ पूर्णपणे अपयशी ठरली असून, त्‍याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी खिल्ली मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना उडवली.

cm pramod sawant criticizes rahul gandhi
Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

प्रदेश काँग्रेसच्‍या गोवा (Goa) राखण यात्रेचा रविवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी यांच्‍या उपस्‍थितीत मडगावात समारोप केला. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी, देशात सर्वाधिक भ्रष्‍टाचार गोव्‍यात होतो. विकासाच्‍या बाबतीत गोवा मागास आहे. भाजप सरकार लोकांच्‍या जमिनी लाटून त्‍या परप्रांतीयांना विकत आहे, असे विविध आरोप केले. त्‍यावर बोलताना, गोवा देशभरासाठी विकासाचे मॉडेल बनलेले आहे. त्‍यामुळे स्‍वयंपूर्ण गोवा हे मॉडेल पाहण्‍यासाठी विविध राज्‍यांचे अधिकारी गोव्‍यात येत आहेत. जनतेच्‍या प्रगतीबरोबरच राज्‍य सरकार पायाभूत साधनसुविधांचाही विकास साधत आहे.

cm pramod sawant criticizes rahul gandhi
Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

जमिनी विकणारे भाटकार काँग्रेसकडे

राज्‍य सरकार गोव्‍यातील जमिनी विकत असल्‍याच्या राहुल गांधी यांच्‍या आरोपाला प्रत्‍युत्तर देताना, ‘‘मोठ्या प्रमाणात जमिनी बहुजन समाजाकडे नसून, त्‍या भाटकारांकडे आहेत आणि तेच भाटकार जमिनी विकत आहेत. असे सर्व भाटकार काँग्रेसकडेच आहेत. त्‍यामुळे सरकारला दोष देण्‍यात अर्थ नाही’’, असे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक म्‍हणाले. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रात असलेले एनडीए सरकार पाडण्‍याचा प्रयत्‍न विरोधी काँग्रेस अनेक वर्षांपासून करीत आहे. परंतु, मोदींनी हे आधीच ओळखून तशी बांधणी करून ठेवलेली आहे’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

cm pramod sawant criticizes rahul gandhi
Goa Politics: गोव्याची माणुसकी हरवतेय? खरगेंच्या ताफ्याला झालेल्या विरोधाने ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ

म्‍हादईवरून गोमंतकीयांना फसवण्‍याचे प्रयत्‍न

कर्नाटकात सध्‍या काँग्रेसचे सरकार आहे. तरीही राहुल गांधी यांनी गोव्‍याची जीवनदायिनी असलेल्‍या म्‍हादईवर बोलणे पूर्णपणे टाळले. कर्नाटकातील अनेक प्रभारी काँग्रेसने नेमलेले आहेत. तेही या विषयावर बोलत नाहीत. यातून कर्नाटकातील काँग्रेस नेते गोव्‍यात येऊन गोमंतकीय जनतेला फसवण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत, हेच स्‍पष्‍ट होते. परंतु, गोमंतकीय जनता हुशार आहे. जनतेला सर्व काही समजते, असेही दामू नाईक म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi 2029 election plan
Rahul Gandhi Goa Visit Analysis
Rahul Gandhi Goa Speech
Rahul Gandhi silence on Mhadei River dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com