जैवविविधता, कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार! CM सावंत; मिठागर संदर्भातील विशेष कार्य समितीची झाली बैठक

Biodiversity Action Plan: मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मंगळवारी गोवा राज्य पाणथळ प्रदेश प्राधिकरणाची १९ वी बैठकही पार पडली.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील जैवविविधतेच्‍या संवर्धनासाठी आखलेल्‍या जैवविविधता धोरण आणि कृती आराखड्याची आमदार आणि विभाग प्रमुखांच्‍या सहकार्याने यशस्‍वीरीत्‍या अंमलबजावणी करण्‍यात येणार असल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्य जैवविविधता मंडळाची ४५ वी बैठक मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांच्‍या अध्‍यक्षेखाली मंगळवारी पर्वरीत पार पडली. जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना बळकटी देणे, राज्य जैवविविधता संवर्धन पुरस्कार २०२५ आणि जैवविविधता वारसा स्थळांवरील प्रगती यावर बैठकीत चर्चा करण्‍यात आली.

जैवविविधतेच्‍या रक्षणासाठी सरकारने मंजूर केलेला राज्‍य जैवविविधता धोरण आणि कृती आराखड्याची आमदार आणि विभाग प्रमुखांच्‍या सहकार्याने प्रभावी अंमलबजावणी करण्‍याचा निर्णयही बैठकीत झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मुख्‍यमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मंगळवारी मीठागरांसंदर्भात स्‍थापन केलेल्‍या विशेष कार्य समितीची पहिली बैठक झाली.

CM Pramod Sawant
Goa Governance: 'गोमंतकीयांच्या समस्या आता AI सोडवणार'! मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच; 90% तक्रारींचा 2 दिवसांत निवारणाचा दावा

मीठागरांच्‍या संवर्धनासाठी सरकारने ‘मीठागर संवर्धन मदत आणि पुनर्जीवन योजना’ सुरू केलेली आहे. पारंपरिक मीठ शेती पुनर्संचयित करणे, मीठागर मालकांना आर्थिक मदत देणे आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि कृषी वारशाचे रक्षण करणे हा योजनेचा उद्देश असल्‍याचे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

CM Pramod Sawant
Government Jobs: गोवा सरकारची मेगा भरती! आरोग्य खात्यात 59, तर समग्र शिक्षा अभियानात 66 कंत्राटी पदांसाठी 'सुर्वणसंधी'

पाणथळ प्रदेशांच्‍या रक्षण, संवर्धनाचे प्रयत्‍न

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मंगळवारी गोवा राज्य पाणथळ प्रदेश प्राधिकरणाची १९ वी बैठकही पार पडली. राज्‍यातील पाणथळ प्रदेशांचे संवर्धन व संरक्षणासाठी अतिरिक्त पाणथळ प्रदेशांची ओळख करण्‍यासंदर्भातील निर्णय या बैठकीत घेण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com