आमदार अपात्रता याचिका हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजप कडुन पहिली प्रतिक्रीया

अपात्रतेची मागणी करणाऱ्या काँग्रेस आणि एमजीपीच्या याचिका फेटाळून लावण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो;नरेंद्र सावाईकर
Narendra Sawaikar
General Secretary, BJP, Goa
Narendra Sawaikar General Secretary, BJP, GoaDainik Gomantak

गोवा: आमदार अपात्रता याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर राज्यातील अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान भाजप कडुन नरेंद्र सावाईकर यांची पहिली प्रतिक्रीया समोर आलेली आहे. "अपात्रतेची मागणी करणाऱ्या काँग्रेस आणि एमजीपीच्या याचिका फेटाळून लावण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. निकाल देताना माननीय न्यायाधीशांनी दिलेल्या निकालामध्ये तरतूद, विभाजन, विलीनीकरण, पूर्ण खंडपीठाच्या निकालाचा परिणाम आणि इतर निकाल या सर्व मुद्द्यांचा विचार करण्यात आला आहे. या पुढे जाऊन मत द्यायचे झाल्यास मला निकाल पुर्ण निकाल पहावा लागेल आवडेल. असे मत गोवा भाजपचे (Goa BJP) सरचिटणीस नरेंद्र सावाईकर यांनी मांडले. (first reaction from Goa BJP after decision of High Court on disqualification of MLA )

Narendra Sawaikar
General Secretary, BJP, Goa
निवडणुकांनंतर तरी तक्रारींची दखल घ्या

दरम्यान, मगोपच्या सुदिन ढवळीकरांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. कोर्टाच्या निर्णयावर स्पष्टपणे भाष्य करणे सुदिन ढवळीकर यांनी टाळलं आहे. तसेच वरच्या कोर्टात या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र याचा अंतिम निर्णय पक्षाची केंद्रीय समितीच्या बैठकीत घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

12 आमदारांविरोधात काँग्रेस व मगो पक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निवाडा देताना फेटाळल्या त्यामुळे त्या बारा आमदारांना व पात्रता पासून दिलासा मिळाला आहे.

काँग्रेस (Goa Congress) या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे. हा निकाल काँग्रेसच्या विरोधात लागल्याने मागच्या निवडणुकीसारखी पुनरावृत्ती याहीवेळी होण्याची धास्ती काँग्रेसला आहे. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देण्यासाठी चर्चा सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या याचिकेवरील अंतिम सुनावणी 11 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. त्यावरील निवाडा राखीव ठेवला होता. याचिका दाखल केलेल्यांपैकी सर्वजण विधानसभा निवडणूक पक्षाच्या चिन्हावर तसेच अपक्षपणे लढवत आहेत. त्यातील काहींनी आमदारकीचा (Goa MLA) राजीनामा दिलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com