Cm Pramod Sawant...म्हणून दिगंबर कामत भाजपमध्ये आले; मुख्यमंत्री स्पष्टचं बोलले

मडगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी केले संबोधित
margao news
margao news Dainik Gomantak
Published on
Updated on

आज मडगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मेळावा आयोजित केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास दृष्टीकोनाने ( Vision of Development ) प्रभावित होत दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ते मडगाव येथे मेळाव्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते.

(Cm pramod sawant addressing margao bjp karykarta)

margao news
Goa Developer's Summit: उद्योजकांना सर्वोतपरी सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांची हमी

मी दिगंबर कामत आणि तमाम मडगावकरांना आश्वासन देतो, त्यांनी विकासाबाबत घाबरण्याची गरज नाही. आपण मडगाव एक आदर्श मतदारसंघ बनवू, तसेच मडगाव आता स्वच्छ करणे आवश्यक आहे. सोबत फातोर्डा स्वच्छ करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

margao news
ZP Election: कुठ्ठाळीत मतदान शांततेत पार; नेत्यांमध्ये मात्र आरोप प्रत्यारोप सुरुच

गोव्यात काँग्रेस कोसळत आहे

काँग्रेसने देशावर 60 वर्षे राज्य केले, असे असले तरी आज गोव्यात हा पक्ष कोसळत आहे. महात्मा गांधींच्या नावाचा वापर करून काँग्रेसने देशावर राज्य केले, प्रत्यक्षात इंदिरा गांधी कुटुंबाचा महात्मा गांधी कुटुंबाशी कोणताही संबंध नाही, परंतु त्यांनी त्यांचे नाव केवळ राजकीय लाभासाठी वापरले आहे. असा आरोप ही मुख्यमंत्र्यांनी केला.

या कार्यक्रमादरम्यान दिगंबर कामत म्हणाले की, मी माझ्या लोकांना विश्वासात घेऊन भाजपमध्ये सामील झालो आहे. आणि यापुढे मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अधिक भक्कमपणे राज्यात विकास कामे मार्गी लावू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com