Goa BJP: '2027 ला 27 जागा जिंकून भाजपला बळकट करू', पर्ये मेळाव्यात विश्वजित राणेंचा निर्धार; ‘वक्फ’ विधेयकाला पाठिंबा

Vishwajit Rane: पर्ये येथे आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या नेतृत्वाखाली भव्य भाजप कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते.
Vishwajit Rane, Damu Naik, Divya Rane
Vishwajit Rane, Damu Naik, Divya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: आमच्या पर्ये, वाळपई मतदारसंघातून राज्यात सनातन धर्म आणि सनातन राज्य प्रस्थापित करण्याचा प्रारंभ करू, असा निर्धार आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केला. तसेच, वक्फ सुधारणा विधेयकाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. पर्ये येथे आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या नेतृत्वाखाली भव्य भाजप कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री राणे पुढे म्हणाले, आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत २७ जागा जिंकून भाजपला आणखी बळकट करू. या भव्य मेळाव्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजप नेते रुपेश कामत, आशिष शिरोडकर, पर्ये मंडळ अध्यक्ष श्रीपाद गावस, विनोद शिंदे, जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, देवयानी गावस, तसेच सर्व स्थानिक पंचायतींचे सरपंच, पंच आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राणे पुढे म्हणाले, विरोधकांवर कोणीही विश्वास ठेवू नका. सत्तरीचा विकास हा आमच्याकडूनच होत आहे आणि होत राहणार. त्यामुळे कोणीही येथे दिशाभुत करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज आहे. येत्या दोन वर्षात अनेक विकास कामे मार्गी लावायची आहेत, येणारा दोन वर्षाचा कार्यकाळ हा महत्वाचा आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच, मंडळ समितीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्वागत श्रीपाद गावस यांनी केले. सूत्रसंचालन उदय सावंत यांनी केले. दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली.या भव्य मेळाव्यास पर्ये मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाचा समारोप केरी येथील युथ क्लबमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

Vishwajit Rane, Damu Naik, Divya Rane
BJP MGP alliance Goa: भाजप - मगोची युती कायम राहणार? ढवळीकर बंधुंना बी. एल. संतोष यांनी दिल्लीत काय आश्वासन दिले?

भाजप राष्ट्रहिताची चळवळ, दिव्या राणे

या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार डॉ. दिव्या राणे यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून, राष्ट्रीयत्व, विकास आणि सेवा यावर आधारित एक चळवळ आहे, असे सांगून त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या संकल्पनेवर भर दिला.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बूथ मजबूत असेल, तर पक्ष मजबूत होईल, असे सांगण्यात आले. तसेच, प्रत्येक घराशी संपर्क वाढवून भाजप हा जनतेच्या विकासाचा पक्ष असल्याचे अधोरेखित करावे असे आवाहन करण्यात आले.

Vishwajit Rane, Damu Naik, Divya Rane
Goa BJP: भाजपच्या बैठकीत विविध आंदोलनांविषयी चर्चा! मराठी भाषा, बेकायदा बांधकामे यावरून अस्वस्थता

विकास नजरेसमोर, दामू

या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, ‘भाजप हा अंत्योदय तत्त्वावर चालणारा पक्ष आहे. सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. सत्तरी तालुक्याचा विकास हा प्रत्यक्ष पाहायला मिळतो. रस्त्यांचे हॉटमिक्सकरण, पायाभूत सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com