गोवा वनविभाग (Goa Forest Department) आणि भारतीय सैन्यदलाच्या (Indian Army) जवानांनी पणजी येथील मिरामार बिचवर (Miramar Beach) स्वच्छता अभियान राबविले. रविवारी मोठ्या प्रमाणावर वनविभागाचे कर्मचारी, सैन्यदलाचे जवान आणि शालेय विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणार बीचवरील कचरा गोळा करण्यात आला. गांधी जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti) स्वच्छता अभियान राबवत सर्वांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
संपूर्ण मिरामार बीचवरील विविध कचरा यावेळी गोळा करण्यात आला. स्थानिका नागरिकांनी देखील यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
स्वच्छता अभियानावेळी मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये प्लास्टिकचे कागद, बॉटल्स, चिप्स पॅकेट यासह विविध प्रकराचा कचरा गोळा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी उपस्थितांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच, स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त या किनारपट्टी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत मिरामार, बायणा, कोलवा, बोगमाळो आणि वेळसाव (Bogmalo, Baina And Velsao) हे पाच बीच या स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता अभियानात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांनी सहभाग घेतला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.