Pandurang Raut Passed Away: गोव्याचे माजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन

फेब्रुवारी 1991 ते एप्रिल 1994 या कालावधीत पांडुरंग राऊत गोव्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत.
Pandurang Raut
Pandurang RautDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचे माजी मंत्री व गोवा प्रजा पक्षाचे नेते पांडुरंग राऊत (Pandurang Raut) यांचे आज (सोमवारी) पहाटे निधन झाले आहे. 76 वर्षांचे असलेले राऊत मागील काही दिवसांपासून आजारपणामुळे त्रस्त होते. फेब्रुवारी 1991 ते एप्रिल 1994 या कालावधीत पांडुरंग राऊत गोव्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत.

Pandurang Raut
Goa Crime: वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पणजीत 338 CCTV कॅमेरे

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पांडुरंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, पांडुरंग राऊत यांनी गोव्याच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि सेवा यासाठी लोक त्यांना स्मर्णात ठेवतील अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी राऊत यांना श्रद्धांजली दिली आहे. या दु:खाच्या प्रसंगी मी राऊत कुटुंबियांच्या सोबत आहे असे सावंत यांनी म्हटले आहे.

पांडुरंग राऊत यांचा अल्प परिचय

पांडुरंग दत्ताराम राऊत यांचा जन्म 1946 रोजी झाला. महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाच्या तिकीटावर 1989 साली राऊत पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून गेले. फेब्रुवारी 1991 ते एप्रिल 1994 या कालावधीत त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. तसेच, 1999 ला तिसऱ्यांदा ते गोवा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. याशिवाय 1999 ते 2000 या कालावधीत राऊत सरकारच्या कमिटीचे सदस्य होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Inquiry Order
goa crime branch busts two fake call centers
Goa Mandovi River Casino Dispute
Goa Karnataka Border Conflict 2026:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com