Human Trafficking: मानवी तस्करी होत असल्याचा दावा खरा: विजय सरदेसाई

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आपण राज्यात मानवी तस्करी होत असल्याचा दावा केला होता, तो दावा आता खरा ठरला आहे.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

Human Trafficking In Goa: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आपण राज्यात मानवी तस्करी होत असल्याचा दावा केला होता, तो दावा आता खरा ठरला आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिक्रियेतून ते स्पष्ट होत असल्याचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Vijai Sardesai
बंधारा प्रकल्प रद्द करा अन्यथा ऐन गणेशचतुर्थीतच आंदोलन

भोमवासीयांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सरदेसाई यांनी सांगितले की, आपण अधिवेशनात राज्यात मानवी तस्करी होत असल्याचे सांगितले होते. मानवी तस्करीबाबात केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था याप्रकराचा तपास करीत आहेत. आता कळंगुटमधील प्रकारानंतर एका माजी पोलिस अधिकाऱ्याने त्याबाबत दुजोरा दिला आहे. राज्यातील पोलिसांवर कोणातीही दबाव न आणता आणि त्यांना मोकळीक दिली, तर ते कारवाई करू शकतात.

Vijai Sardesai
Goa Ganesh Chaturthi 2023: म्हापशातील स्वर साई घुमट आरती मंडळाची गगनभरारी

बेपत्ता वन अधिकाऱ्याचे काय झाले ?

आपण केलेला दावा राज्य सरकार स्वीकारतच नाही, असे सांगत ते म्हणाले, वनखात्याचा अधिकारी बेपत्ता झाल्याचा तपास होत नाही, त्या प्रकरणात नक्की काय झाले आहे, ते तरी कळायला हवे. अन्यथा त्याची फाईल बंद केली म्हणून जाहीर करायला हवे. आत्तापर्यंत त्या व्यक्तीविषयी काहीच हाती लागत नाही, हे ऐकण्यासही योग्य वाटत नाही.

‘ती’ आपली तडकाफडकी प्रतिक्रिया !

राज्याचे नाव बदनाम होत असले तर आम्हाला दुःख होतेच. पोलिस महासंचालकांनी जे मत व्यक्त केले, त्यावर आपण तडकाफडकी प्रतिक्रिया दिली आहे. आपण काय बोलावे, हे कोणी सांगू नये. ट्विटवर कोणी काय प्रतिक्रिया दिली आहे, त्यावर त्यांची ती प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण कधीही पोलिसांमध्ये राजकीय हस्तक्षेप करीत नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com