मोरजी: भाजपा (BJP) महिला शक्ती राज्यात सक्षम आहे ,ती आता विस्तारित आणि व्यापक करण्यासाठी सर्व महिलाना संघटीत करून भाजपा सरकार बळकट करताना पुढील पाच वर्षासाठी भाजपचेच पूर्ण बहुमतांनी सरकार यायला पाहिजे त्यासाठी महिलांनी संघटीत व्हावे , आपण कधी पक्षाला महत्व दिले नाही मात्र विकासासाठी सत्येचा वापर केला, आता यापुढे आजीवन आपण भाजपशी प्रामाणिक राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी दिली. (Babu Ajgaonkar said that he will remain loyal to BJP for the rest of his life)
पेडणे मतदार संघ भाजपा महिला मोर्चा समितीची निवड केल्यानंतर 18 रोजी पेडणे शाशकीय विश्राम धाम येथे आयोजित महिला मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते. पेडणे भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी निकिता तोरस्कर सरचिटणीस देविका सातार्डेकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर गोवा प्रदेश महिला सरचिटणीस शिल्पा नाईक उपाध्यक्षा नयनी शेटगावकर, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , सरचिटणीस तथा पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलाशावकर ,तोरसे जिल्हा सदस्य सीमा खडपे, धारगळ जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, कोरगाव माजी सरपंच सिद्धी शेट्ये, कोरगाव सरपंच उमा साळगावकर, वझरी सरपंच करुणा नाईक, पोरस्कडे सरपंच ग्रेन्सी परेरा, चांदेल सरपंच संतोष मळीक, कोरगाव माजी सरपंच प्रमिला देसाई,आदी उपस्थित होते.
आश्वासन दिले नाही
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना आपण धारगळ मतदार संघात 1999 साली प्रवेश केला, त्यावेळी आपण त्या निवडणुकीत कुणालाच आश्वासन दिले नाही .आपल्याला एक संधी द्या आणि काम करून घ्या असे सांगितले होते आणि लोकांनी निवडून दिले .
विकासासाठी सरकार हवे
मतदार संघाचा विकास करण्यासाठी पावर हवी ती पावर आपण सत्येत जावून घेतली, आणि कामाला गती दिली. कामांची स्पीड वाढवली कारण सरकार तीन तीन महिन्याने कोसळत होते ,आपल्याला भीती होती त्यानंतर मिळेल त्या सरकारात केवळ मतदार संघाच्या विकासासठी संधी घेतली असे मंत्री आजगावकर म्हणाले. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले कि आपण कधी कुणाचेच सरकार पाडले नाही उलट सरकार बनवले आणि विकासाला संधी दिली असा दावा मंत्री आजगावकर यांनी केला.
या पुढेही भाजपचेच सरकार: शिल्पा नाईक
गोवा प्रदेश भाजपा महिला सरचिटणीस शिल्पा नाईक यांनी बोलताना याही पुढे भाजपाचेच सरकार सत्येवर येणार आहे आणि त्यासाठी महिला शक्तीचा मोठा सिहाचा वाटा उचलणार आहे. भाजपची महिला शक्ती प्रामाणिक कार्य करत आहेत . हि निवडणुकी तशी सोपी नाही याचे भान ठेवून महिलांनी काम करावे. शिल्पा नाईक यांनी बोलताना भाजपा हा एकमेव पक्ष होता जो कोरोना काळात फिल्डवर होता , जनता घरात बसून होती तर भाजपचे कार्यकर्त्ये घरी न राहता कोरोना काळात मदत करण्यासाठी रस्त्यावर होती , जीवाची पर्वा न करता कार्य केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.