कदंबच्‍या इलेक्‍ट्रिक बसचे गोवेकरांना विशेष आकर्षण

गोवेकरांना कदंब बसचे कुतूहल, आकर्षक रंग, ऐसपैस जागा व आवाजही कमी
Kadamba electric bus
Kadamba electric busDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव-कारवार (Madgaon) मार्गावर सुरु झालेल्या चार इलेक्‍ट्रिक कदंब (Kadamba electric bus) बसेसमुळे कारवारप्रमाणेच काणकोणपर्यंतच्या (Canacona) दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून ते वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेऊ लागले आहेत.

केंद्र सरकारच्या योजनेतून गोव्याला मिळालेल्या या बसेस साधारण तीन महिने बंदच होत्या. पण आता 23ऑगस्टपासून त्‍या सुरू झाल्‍या आहेत. मडगाव-कारवार मार्गावर त्यातील चार बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्या दिवसाकाठी चार खेपा मारतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावरील बसेसना प्रवाशांकडून साधारणत: 60 ते 70 टक्के प्रतिसाद मिळत आहे.

Kadamba electric bus
Goa: यंदा दहीहंडीला परवानगी मिळणार का?

12 मीटर लांबीच्या या बसेस हे या मार्गावरील प्रवाशांसाठी मोठे कुतूहल ठरत आहे. कारण त्यांचा आकर्षक रंग. तसेच त्या अजिबात आवाज न करता त्वरित वेग पकडतात व घाटही त्याच वेगात पार करतात. प्रवाशांना बसायला ऐसपैस जागा आतमध्‍ये आहे. ओलेक्‍ट्रा

ग्रीन टेक्नोलॉजीच्या या गाड्यांवर कदंबने सदर कंपनीकडून खास प्रशिक्षण देऊन आणलेले चालक असून त्यांना ग्रीन टेक्नोलॉजीचे प्रतीक असलेले हिरवे शर्ट दिलेले आहेत. चालक व वाहकालाही प्रशिक्षण दिलेले असून प्रवाशांशी त्यांची वागणूक आदबशीर असते. चालकाला बस लांब तसेच उंच असल्याने ती थांबविताना व मुख्य रस्त्यावर आणताना विशेष काळजी घ्यावी लागते.

Kadamba electric bus
Goa: समुद्र किनाऱ्यावर कोरोना नियम धाब्यावर

चार्ज केल्‍यावर कापतात 250 किमी अंतर

कदंबच्या या इलेक्‍ट्रिक बसेसकडे प्रवाशांचा ओढा दिसून येतो. कदंब महामंडळाच्‍या सूत्रांनी सांगितले की, मडगाव डेपोत या बसेस चार्ज करण्यासाठी स्टेशन सुरू करण्‍यात आलेले आहे. दिवसाची फेरी आटोपून परतताच त्या चार्जिंगसाठी लावल्या जातात. एकदा चार्ज केलेली बस सलग 250 किलामीटर अंतर कापू शकते. ऑक्टोबरमध्ये अशा आणखी 20 बसेस कदंबकडे पोचतील व त्यानंतर आणखी बसेस कारवार व अन्य मार्गावर सुरु केल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com