Margao : 'मुख्यमंत्री तीर्थ यात्रा दर्शन योजनेचे तीन तेरा! ....कृपा करा आणि ही योजना बंद करा; नागरिक संतापले

तिरुपतीहून हवालदिल होऊन परतलेल्या भाविकांची सरकारकडे मागणी
Vasco
VascoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: 'मुख्यमंत्री तिर्थयात्रा दर्शन या योजनेअंतर्गत नागरीकांना तीर्थ स्थळावर नेऊन यापुढेही आम्हा वृद्धांचे असेच हाल करणार असाल तर माझी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे कळकळीची विनंती आहे. ''कृपा करा आणि ही योजना बंद करा'', अशी प्रतिक्रिया तिरुपतीच्या प्रवासाहून परत आलेल्या मडगाव येथील भाविकांनी व्यक्त केली आहे.

(Citizens of Vasco demand to stop Chief Minister's Tirtha Yatra Darshan Yojana)

प्रवासाहून परत आलेल्या भाविकांनी संतप्त होत प्रसार माध्यमांसमोर आपली कैफियत मांडली. मडगाव येथील या यात्रेला गेलेल्या पुनम प्रभुगावकर यांनी प्रवासारम्यान कसे हाल झाले त्याबद्दल सांगताना, तिरुपती जाईपर्यंत ट्रेनमध्ये आमची व्यवस्था चोख झाली मात्र तिरुपतीमध्ये आमची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती ते हॉटेल लोकांनी राहण्याच्या लायकीचे नव्हते. तिथल्या चादरींना कुबट वास येत होता. काही खोल्यात तर चक्क पाणी गळत होते.

या यात्रेला सुमारे 800 भाविक गेले होते. तिरूपती येथे या भाविकांची व्यवस्था पाहण्यासाठी कुणीही समन्वयक नव्हता. त्यामूळे व्हीआयपी दर्शन पास असुनही भाविकांना सहा तास रांगेत उभे रहावे लागले. या यात्रेला गेलेल्या अर्ध्या भाविकांना बालाजीचे दर्शनच झाले नाही असे प्रभूगावकर यांनी सांगितले. प्रभुगवकर पुढे म्हणाल्या, तिथे आम्हाला जे जेवण दिले तेही तोंडात घालण्यासारखे नव्हते. त्यामुळे कुणी हे जेवण जेवलेच नाहीत. त्यातच पावसात भाविक भिजल्याने त्यांना उपाशीपोटी संपूर्ण रात्र कुडकुडत काढावी लागली असे त्या म्हणाल्या.

Vasco
Panjim : पणजी येथील हार्डवेअर गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

या यात्रेवर गेलेल्या ज्येष्ठ महिला आनंदी केणी यांनी सांगितले, आम्हाला ज्या हॉटेलात ठेवण्यात आले होते तिथे गरम पाण्याचीही सोय नव्हती. ज्येष्ट नागरिकांना यात्रेवर घेऊन जात असाल तर त्यांच्यासाठी किमान गरम पाण्याची सोय तरी करण्याची गरज नव्हती का? असा सवाल त्यांनी केला.

Vasco
Panjim: पणजीत सुसज्ज अन् स्वच्छ शौचालयांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज

या यात्रेला मडगावच्या माजी नगराध्यक्ष सुशीला नायक या देखील गेल्या होत्या. त्यांना याबद्दल विचारले असता, अवकाळी पाऊस आल्याने आयोजकांची तारांबळ उडाली. त्यामुळे योग्य प्रमाणात समन्वय झाला नाही. पण पहिल्या दिवशी कुणाला दर्शन चुकले त्यांना दुसऱ्या दिवशी दर्शनाची सोय करण्यात आली असे त्यानी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com