चौकीदार चोर है! आरोपी सुलेमान फरार होणे ही CM सावंत यांची PM मोदींना मानवंदना; काँग्रेसची टीका

Suleman Khan Escape From Police Custody: गुन्हे शाखेच्या रायबंदर कार्यालयात सकाळी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी दोघांच्या शोधासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्यात.
चौकीदार चोर है! आरोपी सुलेमान फरार होणे ही CM सावंत यांची PM मोदींना मानवंदना; काँग्रेसची टीका
Amarnath Panajikar, Goa CM Sawant And PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Suleman Khan Escape From Goa Police Custody

पणजी: गुन्हे शाखेच्या कोठडीतून सिद्दीकी उर्फ ​​सुलेमान खान फरार झाल्यानंतर गोव्यात आता राजकारण तापू लागले आहे. घटना उघडकीस आल्यानंतर काँग्रेसने सत्ताधारी भाजप आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. सुरक्षेसाठी ठेवलेल्या पोलिसाचीच मदत घेऊन आरोपी फरार झाल्याने 'चौकीदार चोर है', म्हणत 'ही घटना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना,' असल्याची टीका काँग्रेसने केलीय.

काँग्रेस मीडिया सेल अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी सुलेमान फरार होत असलेल्या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत भाजप सरकारवर टीका केली.

"आयआरबी कॉन्स्टेबल आणि त्याच्या साथीदारांनी लँड ग्रेबर सिद्दीकी उर्फ ​​सुलेमान खानला गुन्हे शाखेच्या कोठडीतून पळून जाण्याची परवानगी दिली आणि गोव्याच्या भाजप सरकारने जगाला दाखवून दिले - "चौकीदार चोर है". सदर घटना म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना आहे", असे पणजीकर म्हणाले.

चौकीदार चोर है! आरोपी सुलेमान फरार होणे ही CM सावंत यांची PM मोदींना मानवंदना; काँग्रेसची टीका
Suleman Khan: सुलेमान खान कोठडीतून कसा पसार झाला? पाहा CCTV Footage; पोलिस हाय अलर्टवर

यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी देखील या घटनेवरुन, "कोठडीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. सुलेमानला कोठडीत व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत होती. तो कोठडीच्या बाहेर खाटेवर झोपत होता. गुन्हे शाखा आणि गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यायला हवे", असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

चौकीदार चोर है! आरोपी सुलेमान फरार होणे ही CM सावंत यांची PM मोदींना मानवंदना; काँग्रेसची टीका
Suleman Khan: पोलिसानेच केली फितुरी! गोवा जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी पोलिस कॉन्स्टेबलसोबत कोठडीतून पसार

गिरिश चोडणकर यांनी देखील याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्तांना दोषी धरत राजीनामा देण्याची मागणी केली. तसेच, सुलेमानचे पलायन पूर्वीचे प्लान केले होते का? असा सवाल देखील चोडणकरांनी उपस्थित केला.

चौकीदार चोर है! आरोपी सुलेमान फरार होणे ही CM सावंत यांची PM मोदींना मानवंदना; काँग्रेसची टीका
Goa Drug Case: सनबर्न, थर्टी फर्स्टपूर्वी गोवा पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 10 लाखांचा गांजा जप्त

सुलेमान कोठडीतून फरार झाल्यानंतर गोवा पोलिस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. गुन्हे शाखेच्या रायबंदर कार्यालयात सकाळी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी दोघांच्या शोधासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्यात. याप्रकरणात दोघांवर देखील योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com