Chodan Madel Panchayat: चोडण-माडेल पंचायतीचा कारभार महिनाभर ठप्प, पंचायत सचिव देईना नव्या सचिवाकडे ताबा

Chodan Madel Panchayat update: पंचायतीच्या बैठका व पंचायतीचा इतर कारभार ठप्प झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Chodan Madel Panchayat
Chodan Madel PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडी: चोडण -माडेल पंचायत सचिवाने गेल्या महिनाभर नव्या सचिवाकडे ताबा न दिल्याने पंचायतीच्या बैठका व पंचायतीचा इतर कारभार ठप्प झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पंचायत सचिव विठ्ठल गावस यांची बदली तिसवाडी गट कार्यालयात केली असल्यामुळे पंधरा दिवसाने पंचायत बैठक गेल्या २५ आॅगस्ट रोजी घेण्यात आली होती. नवीन सचिव रती मुळगावकर यांच्याकडे सचिवपदाचा ताबा अजूनही न मिळाल्याने महिना उलटला तरी पंचायत बैठक झालेली नाही.

यामुळे ग्रामस्थांनी लेखी स्वरुपात मांडलेल्या समस्या तशाच पंचायतीत धूळ खात पडून आहेत. ग्रामस्थ पंचायतीत हेलपाटे मारत असून नव्याने ताबा घेतलेले सरपंच रमाकांत प्रियोळकर हतबल झाले आहेत.

Chodan Madel Panchayat
Goa Education: 6 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच यापुढे पहिलीमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

दरम्यान, खास ग्रामसभेविषयी चोडण नागरिकांची एक बैठक माडेल फेरी धक्याजवळ रविवार,२८ रोजी झाली. स्थानिक आमदाराने फेरीबोटीचे दर कमी करण्याचे आश्वासन ‘युनायटेड चोडणकार’ यांना देऊनही यांची पूर्तता न केल्याने या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

फेरीबोटीसंबंधी ग्रामसभा रखडली

चोडण येथील लोकांनी रो- रो फेरीबोटीचे दर व इतर समस्या मांडण्यासाठी बोलाविण्यात आलेली खास ग्रामसभा अजूनही न घेण्यात आल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंबंधी सरपंच रमाकांत प्रियोळकर यांनी सांगितले, की सचिवाचा ताबा नव्या सचिवाकडे मिळायला विलंब होत असल्याने पंचायतीचा कारभार सध्या ठप्प आहे.

Chodan Madel Panchayat
Goa Crime: हडफडेत पूर्ववैमनस्यातून मारवाडी तरुणास मारहाण, सात जणांनी केला हल्ला; पोलिस तक्रार नोंद

खास ग्रामसभेचे आयोजन १५ सप्टेंबर पूर्वी करणार असा ठराव मागील ग्रामसभेत घेऊनही पूर्तता न केल्याने काल सोमवारी सकाळी ११ वा. काही ग्रामस्थ सरपंचांना खास ग्रामसभेसाठी जाब विचारण्यास गेले असता सरपंच पंचायत कार्यालयात फिरकलेच नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com