Chirag Nayak
Chirag NayakDainik Gomantak

Chirag Nayak: मडगावचे युवा उद्योजक चिराग नायक लवकरच सुरु करणार राजकीय इनिंग; काँग्रेसची धरणार वाट!

Goa Congress: मडगावचे युवा उद्योजक चिराग नायक यांनी आपण लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सोशल मीडियावरुन सांगितले.
Published on

मडगाव: मडगावचे युवा उद्योजक चिराग नायक यांनी आपण लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सोशल मीडियावरुन सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी नायक यांनी आपण राजकीय मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीनंतर जर मडगावात विधानसभेची पोट निवडणूक झाली तर ती पोट निवडणूक आपण लढवणार असे त्‍यांनी त्‍यावेळी जाहीर करुन सर्वांचे लक्ष वेधले होते.

दरम्यान, चिराग नायक हे मडगावचे प्रसिद्ध उद्योजक दत्ता नायक यांचे चिरंजीव असून या संदर्भात त्‍यांच्‍याशी संपर्क साधला असता, सध्‍या आपण काँग्रेस (Congress) नेत्‍यांच्‍या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार याची तारीख अजून ठरलेली नाही. सुरुवातीला 14 नोव्‍हेंबर रोजी हा पक्षप्रवेश करावा असे ठरले होते. पण आता हा प्रवेश त्‍या आधीही होऊ शकतो असे त्‍यांनी सांगितले.

Chirag Nayak
Goa Congress: गोवा काँग्रेसमधली गटबाजी संपली? चोडणकरांची पाटकर, युरींबाबत स्तुतिसुमने

काँग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याचे प्रायोजन काय असे विचारले असता, आमचे घराणे पूर्वीपासू्न काँग्रेस पक्षाची विचारसरणी घेऊन पुढे जाणारे आहे. माझे वडील दत्ता नायक हेही काँग्रेस पक्षाशी जवळ होते. त्‍यामुळे या पक्षात मी प्रवेश करणे साहजिक आहे असे सांगून सध्‍या तरी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्‍यापुरताच आपण निर्णय घेतलेला आहे. आणखी काहीजर असेल तर ते नंतर जाहीर करेन अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com