Goa Congress: गोवा काँग्रेसमधली गटबाजी संपली? चोडणकरांची पाटकर, युरींबाबत स्तुतिसुमने

Girish Chodankar: माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली
Girish Chodankar: माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली
Goa Congress Leader Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Political News

पणजी: राज्यातील काँग्रेसमध्ये अमित पाटकर आणि गिरीश चोडणकर यांचे गट असल्याचे यापूर्वीच उघड झाले होते, त्यावरून काँग्रेसमधील या दुफळीवर टीकाही होत राहिली, परंतु आता चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे सध्या विविध प्रश्‍नांवरून उठवीत असलेल्या आवाजाविषयी कौतुक केले आहे. त्यामुळे चोडणकर यांनी पाटकर यांना दिलेले हे प्रमाणपत्र गटबाजी संपल्याचे सूतोवाच आहे, असे तरी प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली. काँग्रेस भवनात झालेल्या या परिषदेस अमरनाथ पणजीकर, जॉन नाझारेथ व इतर उपस्थित होते. कर्मचारी निवड आयोगाच्यावतीने पत्रकारांकडून आलेला प्रश्‍न खोडून काढीत त्यांनी सांगितले की, पक्षाचे अध्यक्ष पाटकर व आलेमाव हे दररोज विषय काढीत आहेत, त्यामुळे कदाचित बरेच विषय घेतात व त्यांच्याकडून काहीवेळा विषय राहिला असेल. चोडणकर यांनी पाटकर व आलेमाव यांच्या कामांविषयी केलेले भाष्य हे निश्‍चित पक्षासाठी सुचिन्ह असल्याचे दिसत आहे.

पाटकरांनी तीन आमदारांना घेऊन पक्षाची बूज राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. याच दरम्यान चोडणकरांच्या समर्थकांवर झालेल्या कारवाईमुळे ते दुखावले होते. त्यामुळेच नव्याने अध्यक्ष बनलेल्या पाटकरांपासून चोडणकरांचे समर्थक चार हात लांब राहत आले आहेत. त्यामुळे ही सुंदोपसुंदी काही मिटणार नसल्याचे बोलले जात असतानाच आज चोडणकरांनी पाटकर व युरी यांची बाजू सावरत घेत त्यांचे कौतुक केले.

Girish Chodankar: माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली
Goa Congress: खासगी संस्थांकडून होणाऱ्या फायद्यांबाबत 'श्वेतपत्रिका' काढणार का? गोवा काँग्रेसचा नवीन घोटाळ्याचा आरोप

चोडणकर म्हणाले...

स्टाप सिलेक्शन कमिशनविषयी आपण लेखी तक्रार केली आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी २०१६ मध्ये कर्मचारी निवड आयोग स्थापन केला होता, परंतु त्यानंतरच्या भाजप सरकारने आयोगाच्या नियमांत दुरुस्त्या केल्या आणि प्रत्येक खाते आपल्याला हवी तशी नोकरभरती करून घेत आहे.

चोर्ला घाटात अवजड वाहनधारकांना वाहतूक बंदीची अधिसूचना सरकारतर्फे काढली जात नाही, परंतु काही कालावधीनंतर बंदी हटविल्याचा आदेश न काढताच अवजड वाहनधारकांना पाचशे ते हजार रुपयांचा दंड आकारून साधारणतः ३५ कोटींचा घोटाळा झाला आहे.

संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यास सरकारला अपयश.

संजीवनी साखर कारखाना चालविण्यासाठी परराज्यातील एका व्यक्तीने तयारी दर्शविली होती, पण त्याच्याकडून ५० कोटी रुपये कोणी मागितले?

काँग्रेस सरकार भाजपला कोणत्याही स्थितीत जमिनी विकू देणार नाही. प्रसंगी कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास तयार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com