Chimbel Hit And Run Case : जयेशचा मृतदेह अद्याप शवागारातच; पोलिसांसमोर पेच

पाच दिवसांनंतरही कुटुंबाची भूमिका ठाम
Hit and Run Accident News
Hit and Run Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पार्किंगच्‍या वादातून टॅक्सीचालक जयेश चोडणकर याचा मृत्यू संशयितांनी दंडुक्यांनी केलेल्या मारहाणीतून झाल्याचा निष्कर्ष शवचिकित्सा अहवालात काढण्यात आला आहे. त्‍यामुळे संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी त्याचा कुटुंबीयांनी केली आहे.

परंतु पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात खुनाचा आरोप नोंद न केल्याने आज पाचव्या दिवशीही त्याचा मृतदेह कुटुंबीयांनी स्‍वीकारला नाही. त्यामुळे जयेशचा मृतदेह गोमेकॉच्‍या शवागारातच ठेवण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या या भूमिकेमुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे.

Hit and Run Accident News
मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, विश्‍‍वजीत आणि माझ्यात काेणतेही मतभेद नाहीत

संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला जात नाही, तोपर्यंत जयेश मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी ठाम भूमिका त्‍याच्‍या कुटुंबीयांनी घेतली आहे. काल त्यांनी जुने गोवे पोलिस स्थानकात जाऊन

तशी मागणीही केली होती. शवचिकित्सा अहवालात जयेशचा मृत्यू डोक्यातील रक्तस्रावामुळे झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.

मात्र दंडुक्याने प्रहार केल्याने की वाहनाची धडक बसून मृत्यू झाला या निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचलेले नाहीत. संशयितांनी जयेशचा पाठलाग करून जबर मारहाण केली व वाहनाची धडक बसून त्याचे पाय चिरडले गेले असे पोलिसांचे म्हणणे असले तरी त्याबाबतचा पुरावा अजूनही सापडलेला नाही.

Hit and Run Accident News
दूध पाजून आईने मुलाला खाली ठेवले अन् सात दिवसांच्या चिमुकल्याचा श्वास थांबला, माजोर्डा येथील दुर्दैवी घटना

संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करा

  • पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी आज सकाळी जुने गोवे पोलिस स्थानकाला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली. तसेच जयेशच्या कुटुंबीयांची बाजूही समजून घेतली.

  • तपासकामावेळी जयेशचा मृत्यू संशयितांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यास पोलिस योग्य तो निर्णय घेऊन गुन्हा दाखल करतील असे त्‍यांनी सांगितले. मात्र कुटुंबीय आपल्‍या मागणीवर ठाम राहिले.

  • अगोदर संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा, त्यानंतरच मृतदेह स्वीकारला जाईल, असे त्‍यांनी स्पष्टपणे सांगितले. त्‍यामुळे अजूनही हा प्रश्‍‍न मिटलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com