Goa Stray Dog Menace: भटक्या कुत्र्यांचा हैदोस थांबणार? सर्वोच्च न्यायालयाच्या 'त्या' आदेशानंतर गोव्यात प्रशासकीय हालचालींना वेग

Chief Secretary Stray Dog Review: भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी मंगळवारी सचिवालयातील उच्चस्तरीय बैठकीत घेतला.
Chief Secretary Stray Dog Review
Goa Stray Dog MenaceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी मंगळवारी सचिवालयातील उच्चस्तरीय बैठकीत घेतला. राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीसह विविध नागरी व प्रशासकीय विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला विविध विभागांचे सचिव, विभागप्रमुख तसेच वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेसमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, पशुसंवर्धन विभाग व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, यावर भर दिला. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण व त्यांचे व्यवस्थापन यासंदर्भातील उपाययोजनांचाही आढावा घेतला.

Chief Secretary Stray Dog Review
Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

बैठकीत लवकरच होणाऱ्या संसदीय सामाजिक न्याय समितीच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या तयारीचाही आढावा घेण्यात आला. समितीसमोर विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे मांडण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनासंदर्भातील तयारी, विविध कार्यक्रमांचे नियोजन व नागरिकांच्या सहभागाबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलशी संबंधित विषयांवरही विचारविनिमय करण्यात आला.

Chief Secretary Stray Dog Review
Goa Municipal Administrator: मडगाव, मुरगाव आणि म्हापसा नगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आदेश लागू

राज्य प्रशासनाशी निगडित महत्त्वाच्या विषयांचा नियमित आढावा घेऊन विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने अशा बैठका महत्त्वाच्या असल्याचे यावेळी अधोरेखित केले. प्राधान्यक्रमातील विषयांवर वेळेत प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर बैठकीत भर दिला.

घनकचरा व्यवस्थापन मजबूत करणार

याशिवाय राज्यात घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा झाली. विविध नगरपालिका, पंचायत व संबंधित विभागांनी कचरा संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट प्रक्रियेत अधिक कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी व पर्यावरणीय स्वच्छता राखण्यासाठी कठोर उपाययोजनांवर भर देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com