Chief Minister's Medal : मुख्यमंत्री पदकांची घोषणा; अग्निशमनचे चौघे, तर 7 पोलिसांचा सन्मान

गोवा मुक्तिदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण
Chief Minister's Medal
Chief Minister's MedalDainik Gomantak
Published on
Updated on

Chief Minister's Medal : वर्षभर खात्यांतर्गत सेवा बजावताना उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पदकाने गौरविण्यात येते. यंदा पोलिस दलातील 7 आणि अग्निशमन दलाच्या चौघांना हा सन्मान जाहीर झाला आहे. गोवा मुक्तिदिनी 19 डिसेंबरला या पदकांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल. हा सोहळा पहिल्यांदाच ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर होत आहे.

दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक अभिषेक धानिया, उपअधीक्षक मनोज म्हार्दोळकर, उपअधीक्षक तुषार वेर्णेकर, उपनिरीक्षक देवू माणगावकर, हेड कॉन्स्टेबल संतोष भाटकर, महिला हेड कॉन्स्टेबल छाया गोडकर आणि कॉन्स्टेबल अविनाश नाईक यांना मुख्यमंत्री पोलिस पदके जाहीर झाले आहेत. तर अग्निशमन आणि आपत्कालीन संचालनालयाच्या स्टेशन फायर ऑफिसर रविंद्रनाथ पेडणेकर, सब ऑफिसर रुई फर्नांडिस, वॉच रूम ऑपरेटर देवानंद पार्सेकर, लिडिंग फायर फायटर धर्मेंद्र नाईक यांनाही मुख्यमंत्री पदकाचा सन्मान मिळाला आहे.

Chief Minister's Medal
Margao Railway : धावत्या ट्रेनमधून उतरताना पाय सटकला अन् जीवास मुकला

कळंगुट पोलिस स्थानक सर्वोत्कृष्ट

पोलिस संचालनालयातर्फे आज राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस स्थानकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात कळंगुट हे पहिल्या क्रमांकाचे पोलिस स्थानक ठरले. दुसरा क्रमांक वेर्णा पोलिस स्थानक आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान पणजी स्थानकाने मिळवला.

राज्यसेवेतील सर्वोच्च नागरी पदक

मुख्यमंत्री पदक हे राज्य सरकारच्या सेवेतील सर्वोच्च नागरी पदक आहे. नागरी सेवेतील उत्कृष्ट कामगिरी, धैर्य आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या कामासाठी हे पदक देण्यात येते. पोलिस, अग्निशमन दल , होमगार्ड या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक सन्मानपूर्वक दिले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com