Margao Railway : धावत्या ट्रेनमधून उतरताना पाय सटकला अन् जीवास मुकला

दोन अपघातात दोघांचा मृत्यू
Margao Railway
Margao RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

कोकण रेल्वेच्या मडगाव स्टेशन रेल्वेट्रॅकवर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, एक प्रवासी रेल्वेतून उतरताना पाय घसरुन पडला अन् त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळला आहे. (Two persons have died in two separate accidents between Margao railway station)

Margao Railway
Goa Police: गोवा किनारी भागातील चालण्याऱ्या वेश्या व्यवसाय रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

मिळालेल्या माहितीनुसार मडगाव-नागपूर रेल्वेत चढलेला एक प्रवासी ट्रेन सुटल्यानंतर घाईत उतरत असताना पाय घसरून खाली पडल्याने मडगाव रेल्वे स्थानकावर त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी अवस्थेत त्याला दक्षिण गोवा इस्पितळात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

Margao Railway
Goa Liberation Day: गोवा मुक्तिदिनानिमित्त दिल्लीत रविवारी 'गीत गोंयच्या अस्मितायेचे' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

दुसऱ्या एका घटनेत मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील रहिवासी हेमंत कोशी याचा मडगाव रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री मडगाव रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना एक मृतदेह सापडला.

रेल्वेची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याचं पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना सांगितलं. मृत व्यक्तीच्या खिशात पोलिसांना निवडणूक ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सापडली. यावरुन मृताचे नाव हेमंत कोशी असे असून तो पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोन्ही घटनांची नोंद मडगाव पोलिसात झाली असून रेल्वे पोलीस दल याबाबत तपास करत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही घटनांसाठी सिसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. तसेच या दोन्ही घटना अपघात आहे ? की, आणखी काय आहे ? याचा तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Municipal Council Garbage Tender Scam
100 Killed As Heavy Rain, Storms Hit Uttar Pradesh
drunk beggars creating nuisance in Margao
 Margao Jewelers Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com