CM Pramod Sawant : मुख्यमंत्र्यांची वेळगेत ‘टिफिन पे चर्चा’ कार्यकर्त्यांसोबत सहभोजन संघटित कार्य करण्याचे आवाहन

प्रत्येक गावात मार्गदर्शन, चर्चासत्रे
CM Pramod Sawant
CM Pramod SawantGomantak Digital Team

भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘टिफिन पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचा पहिला कार्यक्रम साखळी मतदारसंघातील वेळगे पंचायत क्षेत्रात पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही स्वतःचे ‘टिफिन’ आणले होते.

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून तो एक परिवार आहे. भाजप पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असून पक्ष विस्तारासाठी सर्वांनी संघटित कार्य करावे, असा संदेश मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला. भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात पक्ष विस्तारित करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे.

CM Pramod Sawant
State Symbols of Goa: गोव्याचे राज्य प्राणी, फळ, फुल माहिती आहेत? जाणून घ्या राज्याच्या प्रतिकांविषयी...

याच अनुषंगाने गोव्यात ‘टिफिन पे चर्चा’ या खास कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. साखळी मतदारसंघातील वेळगे येथील सातेरी मंदिर सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध विषयांवर मुख्यमंत्री सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

CM Pramod Sawant
Goa School : राज्यातील शाळेची घंटा आजपासून घणघणणार; विद्यार्थी-पालक सज्ज

प्रत्येक गावात मार्गदर्शन, चर्चासत्रे

भाजप हा वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे. या पक्षाचा अभिमान बाळगताना मतदारसंघातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आम्हाला पक्षाचे आणि पर्यायाने सरकारचे काम पोहोचवायचे आहे. त्यांचा सर्वांगीण विकास साधायला हवा. यासाठीच मतदारसंघात ‘टिफिन पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रत्येक तीन महिन्यात गावागावांत मार्गदर्शन, चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे विचारांची देवाणघेवाण कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com