Goa School : राज्यातील शाळेची घंटा आजपासून घणघणणार; विद्यार्थी-पालक सज्ज

नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ; मदतीसाठी पोलिसही तैनात
Goa School
Goa SchoolDainik Gomantak

यंदाचे शैक्षणिक वर्ष सोमवार, 5 जूनपासून सुरू होत आहे. बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदी करून विद्यार्थी शाळेत पहिल्या दिवशी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. परीक्षेनंतर हे विद्यार्थी आपल्या सहकाऱ्यांना भेटणार असल्याने त्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी पालक पाल्यांना घेऊन येणार असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सहज जाता यावे, यासाठी पोलिसांनी सर्वसज्जता ठेवली आहे.

Goa School
Morpirla Parents Protest : मुलांना शाळेत पाठवणार नाही, मोरपिर्ला येथील पालक आक्रमक

राज्यातील सरकारी तसेच अनुदानित शाळा ५ तारखेपासून सुरू आहेत, तर विनाअनुदानित सरकारमान्य शाळा एक दिवस उशिरा म्हणजेच ६ जूनपासून सुरू होणार आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मुले पुन्हा शाळेत जाण्यास उत्सुक झाली आहेत.

नव्या शिक्षण धोरणासही सुरवात

यावर्षीपासून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण सरकारने लागू केल्याने फाऊंडेशन-१ स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना पाठ्यपुस्तकाशिवाय शिक्षण द्यावे लागणार आहे. त्यामुळे या शिक्षकांचा यावर्षी शिकवताना कस लागणार आहे. राज्यातील बहुतेक शाळा व्यवस्थापनांनी वर्गांमध्ये आवश्‍यक सोयी उपलब्ध केल्या आहेत.

नवे दप्तर, नवा टिफीन...

शाळा सोमवारपासून सुरू होणार असल्याने रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, चप्पल्स, रेनकोट, टिफीन बॉक्स व पाण्याची बाटली तसेच इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये पालकांसह मुलांचीही झुंबड उडाली होती. मुलांमध्ये वस्तू खरेदी करताना उत्साह दिसत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com