CM Pramod Sawant: नार्वेतील तीर्थक्षेत्र परिसराचा विकास करणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत ः अष्टमीनिमित्त पंचगंगा नदी तीरावर अभिषेक
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

अष्टमीची जत्रा भरणाऱ्या आणि पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या नार्वे येथील पंचगंगा तिरावरील परिसराचा सरकार विकास करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (बुधवारी) खासदार सदानंद शेट तानावडे आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत केली.

CM Pramod Sawant
Ponda Road Condition| फोंड्यातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू!

अष्टमीनिमित्त नार्वे येथील तीर्थस्थळी पंचगंगा तीरावर अभिषेक केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली.

अष्टमीनिमित्त गोव्यासह अन्य राज्यातून नार्वे गावात येणाऱ्या हजारो भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नार्वे तीर्थक्षेत्राचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. आमदार शेट यांच्या पुढाकारातून हे काम करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून अष्टमीनिमित्त सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या.

CM Pramod Sawant
Goa Drug Case: गोव्यात ड्रग्स माफियांचा धुमाकूळ, अडीच वर्षांत 407 जणांना अटक

प्रेमेंद्र शेट यांनी नार्वेतील अष्टमीची थोरवी सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आरती बांदोडकर, युवा मोर्चा अध्यक्ष राजाराम च्यारी, पिळगावची सरपंच मोहिनी जल्मी आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

नेत्यांकडून देवदर्शन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सकाळी अष्टमीनिमित्त नार्वे येथे जाऊन पवित्र तीर्थक्षेत्री अभिषेक केला. नंतर जागृत देवताचे दर्शन घेतले. खासदार सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नार्वेचे सरपंच संदेश नार्वेकर, पंच तुकाराम गावडे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सपत्नीक अभिषेक करून आपली सेवा अर्पण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa CM Pramod Sawant accident help
Pramod Sawant Ganesh Idol Appeal
Goa ST Political Reservation
Double Engine Government Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com