Goa Drug Case: गोव्यात ड्रग्स माफियांचा धुमाकूळ, अडीच वर्षांत 407 जणांना अटक

देशी-विदेशी नागरिकांसह गोमंतकीयांचा सहभाग चिंताजनक
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak

Goa Drug Case: गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्‍थळ असल्‍याने येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्‍स विक्री केली जाते. उत्तर गोव्‍याच्‍या किनारपट्टी भागात नार्कोटिक व सायक्रोट्रॉपिक ड्रग्‍स विकले जातात, तर ग्रामीण भागात गांजाचा सुळसुळाट सुरू आहे.

Goa Drug Case
Ponda Road Condition| फोंड्यातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू!

हल्‍लीच पश्‍चिम विभागीय पोलिस समन्‍वय समितीची ऑनलाईन पद्धतीने बैठक झाली. मागच्‍या अडीच वर्षांत गोव्‍यात एकूण ४०७ जणांना ड्रग्‍स विक्री प्रकरणात अटक केली आहे. त्‍यात २४३ भारतीय नागरिक, ११३ गोमंतकीय तर ६१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

विमान, जहाज, रेल्‍वेचा वापर

विदेशातून आणलेला एलएसडी, कोकेन हा माल विमानातून किंवा मालवाहू जहाजातून गाेव्‍यात आणला जातो. विदेशी पेडलर्स पुस्‍तकात एलएसडी पेपर लपवून विमानाच्‍या लगेजमधून गोव्‍यात आणतात, तर कोकेन दक्षिण अमेरिकन मालवाहू जहाजांतून गोव्‍यात येते.

गांजा हा उत्तर व पूर्व भारतातून येणाऱ्या रेल्वेमधून गोव्‍यात येतो. सीमेवर येणारा माल बस किंवा खासगी वाहनाने गोव्‍यात आणला जातो.

सीमा भागात ड्रग्‍स तस्‍करीचे अड्डे

गोव्‍यात सध्‍या दोन मार्गांनी ड्रग्‍स येते. एक मार्ग कर्नाटकातून तर दुसरा महाराष्‍ट्रातून येतो. कर्नाटकातून येणारे ड्रग्स संकेश्‍वर- बेळगाव मार्गाने तसेच हुबळी-बेळगाव या मार्गाने गोव्‍यात येते. मोले चेक नाक्‍यावरून तस्कर आपल्या वाहनांतून हा माल गोव्‍यात आणतात. नंतर त्याचे फोंडा, मडगाव, कुडचडे, सांगे या भागांत वितरण केले जाते. महाराष्‍ट्रातून येणारा माल सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील सासोली गावातून गोव्‍यात येतो. सासोलीतून कच्‍च्‍या रस्‍त्‍यावरून हा माल गोव्‍यात आणला जातो, अशी माहिती बैठकीतील सादरीकरणात देण्‍यात आली.

Goa Drug Case
Goa Drugs Case: सीबीआयने डुडू याला बजावली नोटीस; 25 रोजी सुनावणी

नायजेरियनांचा वाढता सहभाग

२०२१ मध्‍ये १३४ गुन्‍हेगारांना ड्रग्‍सप्रकरणी अटक केली होती. त्‍यात २४ गोमंतकीय, ८९ भारतीय तर २१ विदेशींचा समावेश होता. २०२२ मध्‍ये हे प्रमाण दीडपटीने वाढले. मागच्‍यावर्षी १८४ जणांना अटक केली. त्‍यात ५४ गोमंतकीय, १०१ भारतीय, तर २९ विदेशींचा समावेश होता. २०२३ मध्‍ये जूनपर्यंत ८९ जणांना अटक केली असून त्‍यात २५ गोमंतकीय, ५३ भारतीय व ११ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. मागच्‍या अडीच वर्षांत ६१ विदेशींना अटक केली असून त्‍यापैकी निम्‍मे म्‍हणजे ३१ नागरिक नायजेरियाचे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com