CM Pramod Sawant: संजीवनी कारखान्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री भेटणार; रात्री 11 पर्यंत होणार निर्णय

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट
CM Pramod Sawant will meet protester farmer of sanjivani sugar factory
CM Pramod Sawant will meet protester farmer of sanjivani sugar factoryDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना पूर्ववत सुरू करावा, ऊस शेतीला प्राधान्य द्यावे आमि ऊस उत्पादकांची नुकसान भरपाई वेळेत द्यावी, या मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज संप पुकारला होता. यावेळी संजीवनी साखर कारखान्याच्या गेटसमोर जमावाने धरणे आंदोलन केले.

(CM Pramod Sawant will meet protester farmer of sanjivani sugar factory)

तसेच दुपारी महामार्ग रोखण्याचाही प्रयत्न केला. महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 200 हून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कुळे येथे पोलिस स्टेशनमध्ये आणले होते. दिवसभर झालेल्या या घडामोडींमुळे हे प्रकरण चर्चेत होते.

CM Pramod Sawant will meet protester farmer of sanjivani sugar factory
G20 Defamation Notice: मारियो मिरांडाज गॅलरीला G20 आयोजकांकडून 25 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून आज, 17 जुलै रौजी रात्री मुख्यमंत्री या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार असल्याची माहिती आहे. तसेच या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री आज रात्रीच 11 पर्यंत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुळे पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकरी आंदोलकांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि इतर आमदार संजीवनी कारखान्याचा हा विषय उद्यापासून, सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मांडतील, असे सांगितले.

CM Pramod Sawant will meet protester farmer of sanjivani sugar factory
Goa Forest Officer Missing: उसगाव रेंज फॉरेस्ट अधिकारी बेपत्ता; मिरामार परिसरात आढळली कार

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुद्यांवर मौन बाळगून आहे, त्यांना उघडे पाडू. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

आज, सकाळी संजीवनी साखर कारखान्याच्या गेटबाहेर केलेल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. इथेनॉल प्रकल्प होणार की नाही, हे सरकारने लेखी स्वरूपात दिले पाहिजे, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com