मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांनी मानले सर्वांचे आभार

एका विशिष्ठ मर्यादेत तसेच नियमावलीत राहून त्या घेण्यात निवडणूक आयोगाला यश आले
Chief Minister Pramod Sawant and BJP state president thanked all the voters
Chief Minister Pramod Sawant and BJP state president thanked all the votersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आज विक्रमी मतदान झाले. याबद्दल गोमंतकीय नागरिक, निवडणूक आयोग, सुरक्षा आणि पोलिस यंत्रणा, इतर संबधित सरकारी खाती तसेच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचे आम्ही आभारी आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गेले तीन महिन्यांपासून या सर्व यंत्रणा निवडणुका (Election) सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होत्या. आज त्या निर्विघ्नपणे पार पडल्या. कोरोनाच्या (corona) पार्श्र्वभूमीवर या निवडणुका होत असल्याने. एका विशिष्ठ मर्यादेत तसेच नियमावलीत राहून त्या घेण्यात निवडणूक आयोगाला यश आले.

Chief Minister Pramod Sawant and BJP state president thanked all the voters
मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघात उत्साही वातावरणात पडले मतदान पार

राजकीय (Politics) पक्षांनीही याला चांगला प्रतिसाद दिला. तसेच सर्व सामान्य नागरिकांची साथ मिळाली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांचेही योगदान महत्त्वाचे होते. या सर्वांमध्ये दुवा साधण्याचे काम सर्व प्रसारमाध्यमांनी चोखपणे बजावले. याबद्दल या सर्वांचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली मेहनत आणि सत्ताधारी पक्ष या नात्याने राज्य सरकारने उपसलेले कष्ट याचे फळ आज मिळाले. याची प्रचिती आज गोमंतकीय नागरिकांनी भरभरुन केलेल्या मतदानातून आली, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com