मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघात उत्साही वातावरणात पडले मतदान पार

काँग्रेसच्या कार्यकर्ता महिलेशी हुज्जत घातल्याने वातावरण तंग बनले होते, मात्र..
Goa assembly Election Voting Day
Goa assembly Election Voting DayDainik Gomantak

मुरगाव तालुक्यातील चारही मतदार संघात एक दोन प्रकरणे सोडता उत्साही वातावरणात मतदान पार पडले. यात मुरगाव मतदार संघात सर्वाधिक (81.28) त्या पाठोपाठ कुठ्ठाळी मतदार संघात (76.13), दाबोळी मतदार संघात (74.89) तर सर्वात कमी मतदान वास्को मतदार संघात (70.52) झाले.

गोव्यातील 40 विधानसभा (Assembly) जागांसाठी सोमवारी (दि.14) मतदान झाले. त्यानुसार मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघात मिळून एकूण 33 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत शील बंद झाले. यंदा सर्वाधिक मतदार राजानी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया सुरुवात सकाळी धीम्या गतीने झाली. सकाळी 11 वाजेपर्यंत मतदारांचा उत्साह दिसून आला नाही.

Goa assembly Election Voting Day
फातोर्डा मतदारसंघात जनतेने कोणाला दिला काैल?

प्रत्येक मतदारसंघात फक्त 14 ते 15 टक्केच मतदान झाल्याचे पाहण्यात आले. त्यानंतर दुपारी 11:30 वाजल्यानंतर मतदारांचा ओघ प्रत्येक मतदान केंद्रावर दिसून आला. दुपारी 1 वाजल्यानंतर टक्केवारीने उच्चांक गाठून सर्व मतदारसंघात 40 ते 45 टक्के वारी पार केली. यात मतदार राजांचा उत्साह दिसून आला. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान चारही मतदारसंघात झाले होते.

दरम्यान, दाबोळी मतदार संघात नवेवाडे येथे एका मतदान केंद्रा नजीक भाजप (BJP) समर्थक पैसे वाटत असल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नान्डीस यांच्या कानावर पडताच त्यांनी त्या ठिकाणी धावत जाऊन त्यांच्यावर पाळत ठेवली. तसेच त्याने भरारी पथकाला फोन करून पाचारण केले. भाजप समर्थकाला याची चाहूल लागताच त्यांनी तिथून पळ काढला. मात्र भरारी पथकाने त्याच्या पाठोपाठ जाऊन त्याला गाठले व काँग्रेस (Congress) उमेदवार विरियातो यांनी त्याची झडती घ्यायला भरारी पथकाला भाग पाडले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 25 हजार रुपयांचा गठ्ठा सापडला, तो भरारी पथकाने ताब्यात घेतला. यावेळी विरियातो फर्नांडिस व भाजप समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी याविषयी तक्रार दाखल केली आहे.

Goa assembly Election Voting Day
एफसी गोवाविरुद्ध एटीके मोहन बागानचे पारडे जड

दुसऱ्या एका घटनेत मुरगाव (Mormugao) मतदार संघात सर्वेश होबळे या काँग्रेस समर्थकाकडे 50 हजार रुपये सापडले. भरारी पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला निर्वाचन अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

तिसऱ्या एका घटनेत भाजप कार्यकर्ता एका महिलेने काँग्रेसच्या कार्यकर्ता महिलेशी हुज्जत घातल्याने वातावरण तंग बनले होते. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण मिटवले. तसेच येथील सेंट अँड्र्यू चर्चच्या जवळ पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने भरारी पथक तसेच पोलीस त्या ठिकाणी हजर झाले व तेथे उभे असलेल्यांना हुसकावून लावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com