Margao Bus Stand: मडगाव बसस्‍थानकाचा होणार कायापालट

Margao Bus Stand: पंतप्रधानांची सभा : आजपासून व्‍यासपीठ उभारण्‍याचे काम करणार
Margao Bus Stand
Margao Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Bus Stand: बेतुल येथे एनर्जी वीक कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारीला गोव्यात येणार असून त्‍याच दिवशी त्‍यांची मडगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मडगाव बसस्थानकाचा कायापालट होण्‍याची व्‍यक्‍त केली जात असून या भागातील रस्‍त्‍याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामांना शनिवार(ता.27)पासून सुरुवात झाली आहे.

Margao Bus Stand
Goa Tourism: राज्यभरात 75 ठिकाणी वायफाय-हॉटस्पॉट सुविधा

गोव्‍यातील दुसऱ्या क्रमाकांचे बसस्‍थानक असूनही मागच्‍या काही वर्षांपासून स्थानकाची अत्यंत दयनीय स्थिती आहे. स्थानकावरील रस्ता वाईट अवस्थेत जैसे थे आहे.

मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी मुख्‍य रस्‍त्‍याच्‍या बाजूला खडी घालून हा रस्‍ता हॉटमिक्‍स करण्‍याच्‍या कामाला सुरुवात झाली होती.

या बसस्‍थानकाच्‍या मागे असलेल्‍या मोकळ्‍या जागेत मोदींची ही जाहीरसभा होणार आहे. दरम्यान, स्थानक परिसरातील दुकानमालकांना १ ते ८ फेब्रुवारीपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. उद्यापासून व्यासपीठाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com