New Zuari Bridge: इंदिरा गांधींची वाट न पाहता किरण बेदींनी लोकांसाठी खुला केला झुआरी ब्रिज; काय आहे प्रकरण?

किरण बेदी म्हणाल्या होत्या की, मी लोकांची सेवक, लोकांची सोय पाहिली...
Zuari Bridge | Kiran Bedi
Zuari Bridge | Kiran Bedi Dainik Gomantak
Published on
Updated on

New Zuari Bridge: गोव्यात सध्या झुआरी नदीवरील नव्या ब्रिजच्या उद्घाटनाची तयारी चालली आहे. तथापि, त्यातच गोवेकरांना झुआरी नदीवरील पुलाबाबतच्या एका जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. सध्याच्या नव्या पुलाचे उद्घाटन मंत्र्यांची वेळ न मिळाल्याने लांबले आहे ते आता उद्या केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या, गुरूवारी 29 डिसेंबर रोजी होणार आहे. तथापि, काही वर्षांपुर्वी माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गोव्यात कार्यरत असताना झुआरी नदीवरील पुलाचे स्वतःच उद्घाटन केले होते. उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान इंदिरा गांधी येणार होत्या, पण त्यांची वाट न पाहताच किरण बेदी यांनी हा पुल वाहतुकीसाठी खुला केला होता.

(How Kiran Bedi inaugurated old Zuari Bridge in Goa)

Zuari Bridge | Kiran Bedi
Goa Traffic Jam: 'सेल्फी उत्सव हा सरकारच्या मूर्खपणाचा कळस...' विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

खरेतर नव्या झुआरी पुलाचे उद्घाटन याआधीच व्हावयाचे होते, पण केंद्रीय मंत्री गडकरींची वेळ न मिळाल्याने हा उद्घाटनसोहळा पुढे ढकलण्यात आला होता. हा पुल वाहतुकीसाठी तयार आहे, पण केवळ उद्घाटन न झाल्याने त्यावरून अद्याप वाहतुक सुरू करण्यात आलेली नाही. हा पुल लोकांना पाहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खुला केला होता. लोकांनी या पुलाचे स्थापत्य, सौंदर्य, पुलावरून नदीचे सौंदर्य न्याहाळावे, सेल्फी घ्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्या आवाहनानंतर हजारो गोमंतकीयांना या पुलाला भेट दिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसात पणजी ते मडगाव या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

पुल पाहण्यासाठी लोटलेली नागरीकांची गर्दी या ट्रॅफिक जॅमला कारणीभूत असल्याचा आरोप नंतर विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारवर केले होते. तसेच गैरनियोजनावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच आता माजी आयपीएस अधिकारी किरण बेदींचा हा किस्सा समोर आला आहे. त्यांचा व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडिओमुळे आता पुन्हा मंत्र्यांसाठी पुलाचे उद्घाटन थांबवणे योग्य की लोकांची सोय पाहायची, अशी चर्चा गोव्यात सुरू झाली आहे.

Zuari Bridge | Kiran Bedi
Goa Traffic Jam: पणजीत वाहतुकीचा बट्याबोळ; प्रचंड वाहतुक कोंडीने वाहनधारकांना मनस्ताप

पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी या व्हिडिओमध्ये त्यांचा हा 1983 सालचा अनुभव सांगताना दिसतात. किरण बेदी म्हणतात की, मी जेव्हा गोव्यात वाहतुक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा झुआरी नदीवरील पुल बनला होता. पण इंदिरा गांधींच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करायचे असल्याने पुलावरून वाहतूक सुरू नव्हती. इंदिरा गांधींना दोन वेळा या पुलाच्या उद्घाटनासाठी येता आले नव्हते. सर्व वाहतूक जेटीतून होत होती. पुल मोकळा आणि जेटीत गर्दी असे चित्र होते. एकेदिवशी गस्त घालत असताना मी ड्रायव्हरला गाडी थेट पुलावर घ्यायला लावली आणि जेटीसाठी थांबलेल्या वाहनधारकांनाही पुलावर बोलावून घेतले. आणि थेट पुल खुला झाल्याची घोषणा केली. मी पब्लिक सर्व्हंट होते. मी लोकांची सोय पाहिली. त्यानंतर तो पुल वाहतुकीसाठी खुलाच राहिला. त्या पुलाचे नाव झुआरी ब्रिज असे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com