Goa Chapoli Dam: चापोली धरण तुडुंब भरले! काणकोणवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला; गोमंतकीयांमध्ये समाधानाचे वातावरण

Canacona Water Supply: काणकोण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेले चापोली धरण शुक्रवारी सकाळी ७ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.
Canacona Water Supply
Chapoli Dam Full CapacityDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेले चापोली धरण शुक्रवारी सकाळी ७ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. यंदा पावसाने उशीर केल्यामुळे जलाशय सप्टेंबरपर्यंतही भरणार की नाही, अशी भीती नागरिकांसह जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये होती.

मात्र, गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे तब्बल २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धरण तुडुंब भरल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गेल्या वर्षी दमदार पावसामुळे जून महिन्यातच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा मात्र पावसाचा वेग कमी राहिल्याने जलसाठा वाढण्यास विलंब झाला.

Canacona Water Supply
Goa Water Crisis: 'साळावली' धरणात तब्बल 8 मीटर पाण्याचा मोठा तुटवडा! पाऊस न पडल्याचा परिणाम, गोव्यात जलसंकटाची गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती

दरम्यान, चापोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३८.७५ हेक्टोमीटर असून, धरणातून आता तळपण नदीत विसर्ग सुरू झाला आहे. चापोली धरणाची लांबी ७६० मीटर आहे. या नदीतील डोहातून दररोज सुमारे २.५ हेक्टोमीटर पाणी श्रीस्थळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते आणि त्याद्वारे काणकोणवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com