Catherine Zeta-Jones: 'ओह इंडिया! वुई लव्ह यू!' म्हणत बॉलीवुडच्या गाण्यावर थिरकली अभिनेत्री, पाहा व्हिडिओ

गोव्यातील रस्त्यावरून कारमधून जातानाचाही व्हिडिओ केला शेअर
Catherine Zeta-Jones
Catherine Zeta-JonesDainik Gomantak

Catherine Zeta-Jones: हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा-जोन्स हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. हे दोन्ही व्हिडिओ भारतातील आहेत. गेल्या दोन दिवसात कॅथरिन आणि तिचे पती हॉलीवूड अभिनेते मायकल डग्लस त्यांचा मुलगा डिलनसह गोव्यात होते.

मायकल यांचा नुकताच गोव्यातील 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. त्यानंतर आता कॅथरीन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.

Catherine Zeta-Jones
IFFI 2023: भारतीय डॉक्टरने वाचवला हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा-जोन्स यांचा जीव; वाचा सविस्तर...

त्यातील एका व्हिडिओमध्ये त्या गोव्यातील रस्त्यावरून कारमधून जाताना दिसतात. त्यांच्या शेजारी मायकल डग्लस बसलेले दिसतात. तर कारमध्ये पुढे ड्रायव्हर शेजारी त्यांचा मुलगा डिलन बसलेला दिसतो.

तर दुसऱ्या व्हिडिओत एका सांस्कृतिक कार्यक्रमात स्टेजवर बॉलीवूड गाण्यांवर डान्स सुरू असताना एका टेबलभोवती बसलेल्या कॅथरीन या थिरकताना दिसतात. त्यांच्या शेजारी मायकल डग्लसही दिसतात. एकंदरित बॉलीवुडची गाणी त्या एंजॉय करताना दिसतात.

Catherine Zeta-Jones
IFFI 2023: फोर प्ले, क्लायमॅक्स आणि पॉर्न! 'इफ्फी'त हॉलीवूडस्टार मायकल डग्लसकडून अश्लील कॉमेंट्स...

त्यांचे हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यासोबतच कॅथरीन यांचा एक जुना व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. त्या जुन्या व्हिडिओमध्ये कॅथरीन या चक्क इतर डान्सर्ससोबत बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसतात.

कॅटरिना कैफच्या काला चष्मा या गाण्यावर त्या डान्स करताना दिसतात, तेही हाय हिल्समध्ये.

नव्या व्हिडिओजमुळे कॅथरिन यांचा हा जुना व्हिडिओदेखील ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com